Mumbai local railway Saam Tv News
मुंबई/पुणे

Mumbai Local : पावसामुळे लोकलला लेट मार्क, मध्य रेल्वे उशिराने, कल्याण-डोंबिवली स्थानकावर प्रचंड गर्दी

Mumbai Local train update : पावसामुळे मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या उशिरा धावत आहेत, ज्यामुळे कल्याण-डोंबिवली स्थानकावर प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. या अनियमिततेमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Kalyan to cst local train timings : मुंबई आणि उपनगरात रात्रभर पावसाने जोरदार बॅटिंग केली. पहाटे पावसाने उसंत घेतली. आजही मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. गुरुवारी सकाळी कामासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना रेल्वे विलंबाने असल्याने त्रास (Heavy Rain Hits Mumbai) सहन करावा लागला. मध्य रेल्वेच्या लोकल १५ मिनिटे उशिराने आहेत. आधीच पावसाचे वातावरण आणि त्यात लोकलचा लेट मार्कमुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली.

पावसामुळे मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या उशिरा धावत आहेत, ज्यामुळे कल्याण-डोंबिवली स्थानकावर प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. या अनियमिततेमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणारी लोकल १५ मिनिटे उशिराने धावत आहे. तांत्रिक बिघाड आणि सिग्नलमधील अडचणीमुळे लोकल सेवेवर परिणाम झाल्याची माहिती मिळत आहे. लोकल उशिरा असल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मागील दोन दिवसांपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्याचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. तांत्रिक बिघाड आणि सिग्नमधल अडचणीमुळे मध्य रेल्वेच्या गाड्या उशिराने धावत आहे. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल १५ मिनिट उशिराने धावत आहेत. रेल्वे सेवे विस्कळीत झाली आहे.

कामावर जाण्यासाठी चाकरमाने येईल त्या लोकलने प्रवास करत आहेत. नियोजित वेळेत कामावर पोहचण्यासाठी मिळेल त्या लोकलने जात आहेत. त्यामुळे लोकलमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कल्याण, डोंबिवली, घाटकोपर या स्थानकावर मोठी गर्दी झाली आहे. मुसळधार पावसामुळे एक्सप्रेस गाड्या उशिराने धावत आहेत, त्याचा फटका लोकल गाड्याला बसत आहे. त्यामुळे १० ते १२ मिनिटे लोकल उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना गर्दीचा त्रास होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT