Mumbai Rain Update Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Rain Update: मुंबईसह उपनगरांमध्ये उद्या मुसळधार पावसाचा अंदाज; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

Rain Alert News : मुंबईत उद्या आणि पर्वा मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलं आहे.

Ruchika Jadhav

Mumbai News :

उद्या मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे,रायगड आणि धुळेला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. (Latest Marathi News)

पालघर जिल्ह्यात १६ आणि १७ सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तसेच १८ सप्टेंबरला यलो अलर्ट आहे. ठाणेमध्ये देखील पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सोमवारी यलो अलर्ट आहे. मुंबईसाठी पुढील दोन दिवस महत्वाचे असणार आहेत. मुंबईत उद्या आणि पर्वा मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलं आहे.

रायगडमध्ये पुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये यलो अलर्ट देण्यात आलाय. तसेच धुळेमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवातील मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यापर्यंत पावसाने दडी मारली.

पाऊस न पडल्याने राज्यात शेतकरी हवालदील झालेत. अशात गेल्या आठवडाभरापासून पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. त्यात उद्या मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. मुंबईकरांनी आपली काळजी घेऊन घराबाहेर पडावे असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG ships : मोठी बातमी! नागपूरची २ जहाजे इराणच्या हॉर्मुझमध्ये अडकली, केंद्र सरकारनं दिले महत्त्वाचे आदेश

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Vicky Kaushal : विकी कौशलने व्यक्त केली मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा, आवडता दिग्दर्शकही सांगितला

Henna Side Effects : केसांना मेहंदी लावताय? मग थांबा 'हे' नुकसान आधी जाणून घ्या

Original Paithani Saree: गुढीपाडव्याला नेसण्यासाठी ओरिजनल पैठणी साडी कशी ओळखायची?

SCROLL FOR NEXT