Andheri Subway Closed For Traffic Saam Tv
मुंबई/पुणे

Andheri Subway Closed For Traffic: मुंबईत मुसळधार पाऊस, ठिकठिकाणी साचले पाणी; अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद

Mumbai Rainfall Update: वाहतूक पोलिसांनी बॅरिगेट्स लावून अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद केला आहे.

Priya More

संजय गडदे, मुंबई

Mumbai News: मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस (Mumbai heavy Rainfall)पडत आहे. या पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. अशामध्ये अंधेरी सबवे (Andheri Sub-Way) देखील पाण्याने भरला आहे. याठिकाणी चार ते पाच फूटांपर्यंत पाणी साचले आहे. वाहतूक पोलिसांनी बॅरिगेट्स लावून अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद केला आहे. याठिकाणावरुन एकाही प्रवाशाला जाऊन दिले जात नाहीये.

मिळालेल्या माहितीनुसार, हवामान खात्याने मुंबईमध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आज सकाळपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. मागील एका तासापासून मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढले आहे. यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. काही ठिकाणी रस्त्यांना नद्याचे स्वरुप आले आहे. या पवासामुळे मुंबईतील रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा सध्याचा एकमेव मार्ग म्हणजे अंधेरी सबवे हा देखील पाण्याने संपूर्ण भरलेला आहे. या ठिकाणी साधारणपणे चार ते पाच फूट इतके पाणी साचले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक पोलिसांनी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. याठिकाणावरुन ये -जा करणाऱ्या वाहन चालक आणि नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता अंधेरी पूर्वेकडे जाण्यासाठी वाहन चालकांना कॅप्टन गोरे पूल आणि ठाकरे उड्डाणपुलाचा वापर करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT