CM Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

CM Eknath Shinde: मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा; CM शिंदे अलर्ट मोडवर, प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

CM Eknath Shinde Warning On Heavy Rain Alert To Mumbai Konkan: मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलर्ट मोडवर आले आहेत.

Rohini Gudaghe

वैदेही कानेकर, साम टीव्ही मुंबई

राज्यात पावसाची संततधार सुरू आहे. हवामान विभागाने मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलिस, एसडीआरएफ, स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क राहावं. नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, हवामान खात्याच्या इशाऱ्यांबाबत लोकांना अवगत करावं CM शिंदे यांनी सांगितलं आहे.

मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा

मुंबई, कोकणासह इतरही काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय. त्यापार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, महापालिका, नगरपालिका, पोलीस,विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सतर्क राहावं. नागरिकांना सर्व प्रकारची मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज दिल्यात.

CM शिंदे अलर्ट मोडवर

सर्व प्रशासनाने अलर्ट राहावे. हवामान खात्याकडून तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेण्यात यावी. त्यानुसार नियोजन आणि व्यवस्थापन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या (Eknath Shinde Warning On Heavy Rain Alert) आहेत.

दुर्घटनेच्या संभाव्य क्षेत्रांचं सर्वेक्षण करून नागरिकांना त्याबाबत सतर्क करा. राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलाची (SDRF) तयारी उच्च पातळीवरची असावी. बंधारे, तलाव यांचे पाणीस्तर निर्धारित करा. पुराचा धोका निर्माण होऊ नये म्हणून नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्याची यंत्रणा देखील उपलब्ध करून (Mumbai Rain Update) ठेवावी. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अशा क्षेत्रात वाहतूक बंद करावी आणि ती पर्यायी मार्गावर वळवावी.

मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या प्रशासनाला सूचना

हवामान खात्याशी वेळोवेळी समन्वय साधा. त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या विविध अलर्टसची माहिती नागरिकांना जलद गतीने द्यावी. पूरग्रस्त क्षेत्रामध्ये अन्नधान्य, औषधे, साह्यकार्य साहित्य उपलब्ध करून (Heavy Rain Alert To Mumbai Konkan) ठेवा. पर्यायी निवारास्थाने आणि राहण्यासाठी ठिकाणे उपलब्ध करून ठेवावीत. पूरस्थिती निर्माण झाल्यास जनावरांच्या स्थलांतराची व्यवस्था तयार ठेवावी, अशा विविध सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. सर्वांनी सतर्क राहून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT