Mumbai Local Mega Block on Sunday  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Mega Block: रविवारी रेल्वेच्या 'या' मार्गावर मेगाब्लॉक, मुंबईकरांचे होणार हाल!

Satish Daud

Mumbai Local Mega Block on Sunday

मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. उद्या म्हणजेच रविवारी (१४ जानेवारी) रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या विलंबाने धावणार आहे. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आलं आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रूझ ते गोरेगाव अप-डाऊन जलद मार्गावर रविवारी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकदरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील लोकल सेवा सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. तर बोरिवली आणि अंधेरीकडे जाणाऱ्या काही गाड्या हार्बर मार्गावरील (Local Train) गोरेगाव स्थानकापर्यंत धावतील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

रविवारी वडाळा रोड ते मानखुर्द अप-डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यत हा ब्लॉक असेल. सीएसएमटी येथून सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेलसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटीअप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. याशिवाय ब्लॉक कालावधीत पनवेल ते मानखुर्द दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. (Latest Marathi News)

मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेमार्गावरील ठाणे-कल्याण पाचव्या सहाव्या अप -डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री ११.४० ते रविवारी पहाटे ३.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या ब्लॉकदरम्यान सहाव्या मार्गावर धावणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण/दिवा आणि विद्याविहार दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील

याशिवाय पाचव्या मार्गावर चालणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार आणि दिवा/कल्याण दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. तसेच दोन्ही दिशेने निर्धारित वेळेच्या १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मविआत मोठा भाऊ कोण? जागांवर अडले, भाऊ-भाऊ भिडले; मविआत जागावाटपावरून खडाजंगी

Budgam Bus Accident Video: काश्मीरमध्ये पुन्हा भीषण दुर्घटना; BSF जवानांनी खचाखच भरलेली खोल दरीत कोसळली, ४ जणांचा मृत्यू

Israel - Hezbollah War : हिजबोल्ला-इस्त्राइलमध्ये युद्ध पेटलं, स्पेशल रिपोर्ट

Maharashtra News Live Updates : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित

Pune Crime : शाळकरी मुलीवर अत्याचार, इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं; 'गुड टच, बॅड टच'मुळं धक्कादायक घटना उघड

SCROLL FOR NEXT