Mumbai Pune Expressway Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Pune Expressway: प्रवाशांनो लक्ष द्या! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विशेष ब्लॉक, वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

Bharat Jadhav

(दिलीप कांबळे)

Mumbai Pune Expressway:

पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग उद्या एक तासासाठी बंद राहणार आहे. यामार्गावर उद्या दुपारी १२ ते १ च्या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. केवळ हलक्या वाहनांना खोपोली एक्झिटवरून जुन्या महामार्गावरून सोडण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिलीय. (Latest News)

या महामार्गावरील पुणे लेनवर ओव्हर हेड ग्रॅंटी बसवण्यात येणार आहे, यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावरील पुणे लेनवर आयटीएमएस प्रोजेक्ट अंतर्गत आडोशी बोगद्याजवळ ओव्हर हेड ग्रॅंटी बसवण्यात येणार आहे. हलक्या वाहनांसाठी खोपोली एक्झिट वरून जुन्या महामार्गावर शिंग्रोबा घाटातून वाहतूक वळवण्यात येणार आहे. तर उर्वरित वाहतूक खोपोली टोलनाका या ठिकाणी थांबविण्यात येणार आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणारे वाहतूक खालापूर टोल नाका येथे तसेच शोल्डर लेनवर थांबविण्यात येईल.

दरम्यान दोन-तीन दिवसाआधी देखील या महामार्ग बंद करण्यात आला होता. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई वाहिनीवर ITMS प्रोजेक्ट अंतर्गत बोरघाट हद्दीत ४५ किमी/६०० किमी आणि ४१ /५०० किमी या ठिकाणी Gantry बसविण्यात आले होते. बुधवारी देखील Gantry बसवताना या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.

लोणावळा परिसरात वाहतुकीत बदल

नवरात्र उत्सवानिमित्त कार्ला गडावरील श्री एकविरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. राज्याभरात भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात. त्यामुळे नवरात्रौत्सवातील भाविकांची गर्दी लक्षात घेता या भागात मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेत ती सोडवण्याच्या दृष्टिकोनातून अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. कार्ला फाटा ते वेहेरगाव दरम्यान अवजड वाहनांनी बंदी असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

Mithila Palkar: वेब क्विन करतेय इटलीत भटकंती; पाहा फोटो

SCROLL FOR NEXT