Mumbai Pune Missing Link new traffic rules from November 1 saamtv
मुंबई/पुणे

मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरून प्रवास करण्यासाठी नवे नियम लागू; कोणत्या वाहनांना असेल प्रवेश, किती असेल वेगमर्यादा?

Mumbai-Pune Missing Link Rules: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकसाठी १ नोव्हेंबरपासून नवे वाहतूक नियम लागू होणार आहेत. कोणत्या वाहनांना प्रवेश मिळणार, कोणत्या वाहनांना बंदी असेल आणि कार व बसची वेगमर्यादा किती, जाणून घ्या.

Akshay Badve

  • मुंबई पुणे मिसिंग लिंकवर १ नोव्हेंबरपासून कोणते नवे नियम लागू

  • मुंबई पुणे मिसिंग लिंकवर कोणत्या वाहनांना प्रवेश मिळणार

  • मिसिंग लिंकवर खासगी कार आणि बससाठी किती वेगमर्यादा

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान करण्यासाठी या बहुचर्चित 'मिसिंग लिंक' प्रकल्पाबाबत एक सरकारनं अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. या मार्गावरील बोगद्यांची रचना, तांत्रिक बाबी आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन वाहतूक नियम लागू करण्यात येणार आहेत.

हे नियम येत्या १ नोव्हेंबरपासून या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या अपर पोलीस महासंचालक वाहतूक विभागाकडून २६ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलीय. बोगद्यांमधील तांत्रिक बाबी आणि प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.

कोणत्या वाहनांना असेल परवानगी

मिसिंग लिंक मार्गावर खासगी कार, जीप आणि इतर बिगर-वाहतूक हलकी मोटार वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. तसेच प्रवासी बस आणि इतर प्रवासी वाहनांनाही या मार्गाचा वापर करता येणार आहे.

कोणत्या वाहनांना प्रवेश बंदी?

मिसिंग लिंकवर सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. यामध्ये पिकअप व्हॅन आणि टाटा एससारख्या हलक्या मालवाहू वाहनांचाही समावेश आहे. याशिवाय ज्वलनशील, स्फोटक किंवा इतर धोकादायक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही या मार्गावरून जाण्यास सक्त मनाई असेल.

मिसिंग लिंकवरील वेगमर्यादा किती?

मिसिंग लिंकवर वाहनांच्या प्रकारानुसार वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

खासगी कार, जीप आणि इतर हलकी मोटार वाहने: ताशी १०० किलोमीटर

प्रवासी बस आणि इतर प्रवासी वाहने: ताशी ८० किलोमीटर

वाहनचालकांनी निर्धारित वेगमर्यादेचे पालन करावे आणि वाहतूक शाखेच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मिसिंग लिंकवरील बोगदे आणि तांत्रिक बाबी लक्षात घेता वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे, वाहतुकीचे नियम पाळणे आणि धोकादायक पदार्थांची वाहतूक करणारी वाहने या मार्गावर नेणे टाळणे आवश्यक आहे.

मालवाहू वाहनांसाठी हा असेल पर्यायी मार्ग

मिसिंग लिंकवर सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आलीय. यामुळे या वाहनांना आता मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या मूळ जुन्या मार्गिकेचाच वापर करावा लागणार आहे. बोगद्यातील अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप समर्थकाची काँग्रेसच्या सभेत घुसखोरी; मोदी का बाप भी जाएगा, खरगेंचं वादग्रस्त विधान

ऑडिओ क्लिपमध्ये बोलणाऱ्यांच्या मागे बडा नेता, जरांगेंचा खळबळजनक दावा; फडणवीसांना अडकवण्याचा प्लॅन कुणाचा?

Motichoor Laduu Recipe: दिवाळीला घरच्या घरी बनवा बाजारासारखे दाणेदार आणि स्वादिष्ट मोतीचूर लाडू; वाचा सोपी रेसिपी

२० दिवस वैद्यकीय रजा अन् तेलंगणात अटक! पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याच्या कारनाम्याने खळबळ

Maharashtra News Live Update: ठाण्याहून उपनगरात जाणारी रेल्वेसेवा आता पूर्व पदावर येण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT