fatal triple collision on the Mumbai-Pune Expressway that killed two people 
मुंबई/पुणे

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तिहेरी अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

Major Accident on Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रक, कंटेनर आणि एर्टिगा कार यांच्यात झालेल्या भीषण अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

Bharat Jadhav

  • मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पहाटे भीषण तिहेरी अपघात झाला.

  • तांदूळ भरलेला ट्रक, कंटेनर आणि एर्टिगा कार यांची जोरदार धडक.

  • ट्रक चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू झाला.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई मार्गीकेवर पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण अपघात घडला. तांदूळ भरलेला ट्रक, खाद्य तेल वाहून नेणारा कंटेनर आणि एर्टिगा कार यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक व क्लिनर यांचा जागीच मृत्यू झाला असून, इतर तिघेजण जखमी झाले आहेत. (Mumbai Pune Expressway triple accident latest news)

मिळालेल्या माहितीनुसार तांदूळ भरलेल्या ट्रक पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जात होता. चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ते समोर असलेल्या कंटेनरला जोरदार धडकले. याचवेळी बाजूने जाणाऱ्या एर्टिगा कारलाही धडक लागली. धडकेनंतर तांदूळ भरलेला ट्रक आणि खाद्य तेल वाहून नेणारा कंटेनर रस्त्यावर उलटला.

मिळालेल्या माहितीनुसार तांदूळ भरलेल्या ट्रक पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जात होता. चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ते समोर असलेल्या कंटेनरला जोरदार धडकले. याचवेळी बाजूने जाणाऱ्या एर्टिगा कारलाही धडक लागली. धडकेनंतर तांदूळ भरलेला ट्रक आणि खाद्य तेल वाहून नेणारा कंटेनर रस्त्यावर उलटला.

अपघातामुळे तांदळाच्या बॅगा आणि खाद्य तेल रस्त्यावर फेकले गेल्याने काही काळ द्रुतगती मार्गावरील चारही लेन प्रभावित झाले होते. अपघात जखमी झालेल्यांना उपचारासाठी खोपोली ग्रामीण रुग्णालय तसेच एमजीएम रुग्णालय, कामोठे येथे हलविण्यात आले. अपघातग्रस्त वाहने आणि रस्त्यावर पडलेला माल हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

साताऱ्यात ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

बेंगळुरूहून मुंबईच्या दिशेनं निघालेल्या ट्रॅव्हल्स बसला सातारा-पुणे महामार्गावर सारोळे उड्डाणपुलाजवळ भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त बसमध्ये ४० प्रवासी असल्याची माहिती साम टीव्हीच्या सूत्रांनी दिली. या अपघातानंतर बसचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumabi Tourism : गर्दी नाही, गोंधळ नाही; 'येथे' लपलाय अथांग समुद्रकिनारा, जणू मुंबईतला स्वर्गच

Maharashtra News Live Update: सोलापुरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मौलानाविरुद्ध पॉकसो अंतर्गत गुन्हा

जन्म दाखल्यात ‘V-W’ गोंधळ, पालकांचा 370 किमी प्रवास, एका शब्दासाठी 15 दिवसांची वाट पाहा, महापालिकेचा अजब कारभार

Monsoon 2026 Update: जूनमध्येही उष्णतेचा तडाखा कायम; महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस

९० किमी वेग, धडकी भरवणारं वादळ धडकणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, कुठे कोसळणार धो-धो पाऊस?

SCROLL FOR NEXT