Mumbai Pune Expressway Traffic Update SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai Pune Expressway Traffic Update : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मुंबईकडील मार्गिका उद्या २ तास बंद

Mumbai- Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील मुंबईकडील मार्गिका (लेन) उद्या, गुरुवारी (27 जुलै 2023) दोन तास बंद राहणार आहे.

Nandkumar Joshi

Mumbai Pune Expressway Traffic News In Marathi : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीबाबत मोठी अपडेट आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील मुंबईकडील मार्गिका (लेन) उद्या, गुरुवारी (27 जुलै 2023) दोन तास बंद राहणार आहे. द्रुतगती महामार्गालगत डोंगरावर दगड अडकले आहेत. ते काढण्यासाठी ही मार्गिका बंद राहणार आहे.

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील मुंबईकडील लेन उद्या, गुरुवारी दोन तास बंद राहणार आहे. बोरघाट महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश भोसले यांनी ही माहिती दिली. २३ जुलैला आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून दगड-मातीचा ढिगारा थेट रस्त्यावर आला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद झाली होती.

दरड कोसळल्यानंतर काही दगड अधांतरी अडकले होते. ते दगड पाडण्यासाठी उद्या, गुरुवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मुंबईकडील लेन दोन तास बंद राहणार आहे. उद्या दुपारी १२ ते २ या वेळेत या लेनवरील वाहतूक बंद राहील. या कालावधीत रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगरावरील अडकलेले दगड काढण्यात येणार आहेत. केवळ कारच्या वाहतुकीसाठी जुना पुणे-मुंबई महामार्ग शिंग्रोबा घाटातून वाहतूक सुरू राहणार आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, रविवारी रात्रीच्या सुमारास महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली होती. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या तिन्ही लेन बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पहाटे अडीचपर्यंत दरड हटवण्यात आली होती. त्यानंतर दोन लेन सुरू करण्यात आल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

SCROLL FOR NEXT