Mumbai Pune Expressway Latest Marathi News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज पुन्हा ब्लॉक; 'या' वेळेत प्रवास टाळा, कारण काय?

Mumbai Pune Expressway Latest Marathi News: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील पुण्याहून मुंबईकडे येणारी मार्गिका आज म्हणजेच गुरूवारी दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Pune Expressway News: मुंबई ते पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील पुण्याहून मुंबईकडे येणारी मार्गिका आज म्हणजेच गुरूवारी दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दुपारी १२ ते २ या वेळेत ही मार्गिका बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर रविवारी (ता. २३) रात्री ११ वाजेच्या सुमारास ओडीसी बोगद्याच्या मागे दरड कोसळल्याची घटना घडली होती. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दुसऱ्याच दिवशी सकाळी ३ तासांचा ब्लॉक घेऊन तातडीने दरड हटवली.

मात्र, त्यानंतरही या भागात दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने पुण्याहून मुंबईकडे येणारी मार्गिका आज दुपारी १२ ते २ या वेळेत पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. येथील धोकादायक दरडी हटवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

यादरम्यान चार चाकी हलक्या वाहनांना शिंग्रोबा घाटातील जुना पुणे-मुंबई महामार्ग सुरू राहणार आहे. दुपारी १२ ते २ या वेळेत दोन तास अवजड वाहनांना घाटात प्रवेशबंदी करण्यात येणार असल्याचे बोरघाट महामार्ग पोलिस केंद्राचे सहायक निरीक्षक योगेश भोसले यांनी सांगितले आहे.

दरम्यान, गेल्यावेळी काम वेळेत न संपल्यामुळे ब्लॉक लांबला होता. आता उद्या तशीच परिस्थिती निर्माण होणार का, हे पाहावे लागेल. सध्या या परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास सैल झालेल्या दरडी हटवण्याच्या कामात विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे या काळात पुण्याहून मुंबईला येणाऱ्यांना जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करावा लागणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा अत्यंत गजबलेला मार्ग आहे. दररोज या मार्गावरुन हजारो वाहनांची ये-जा सुरु असते. त्यामुळे उद्या ब्लॉक सुरु होण्यापूर्वी पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची संख्या वाढू शकते. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT