Mumbai-Pune Expressway Latest Marathi News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे महामार्गावर २ तासांचा विशेष ब्लॉक; वाहतूक पूर्णत: बंद राहणार, पर्यायी मार्ग काय?

Mumbai Pune Expressway Block: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी हाती आहे. या महामार्गावर मंगळवारी दोन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Vishal Gangurde

सचिन जाधव, पुणे

Mumbai Pune Expressway News:

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी हाती आहे. या महामार्गावर मंगळवारी दोन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

मुंबई-पुणे महामार्गावर मंगळवारी दुपारी १२ ते २ वाजेच्या दरम्यान ग्रँटी बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. महामार्गावरील या कामामुळे वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

वाहतूक बंद राहणार

मुंबई-पुणे महामार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी ६३.००० ग्रँटी उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ३० जानेवारीला दुपारी १२ ते २ या वेळेत करण्यात येणार आहे. या कालावधीत पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने (हलकी तसेच जड-अवजड वाहने) यांची वाहतूक बंद राहील.

यामुळे वाहनाधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने कि.मी. ५४.४०० येथून कुसगाव टोलनाका येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना मुंबई-पुणे महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: लग्नासाठी मुली मिळेना, २ तरुणांनी संपवलं आयुष्य; बुलडाणा हादरले

Political News : भाजप नेत्याला मोठा दिलासा, बलात्कार प्रकरणात कोर्टाकडून क्लीन चिट; नेमकं काय घडलं होतं?

World Earth Day 2026 : 22 एप्रिल हा दिवस जागतिक पृथ्वी दिन म्हणून का साजरा करतात? जाणून घ्या महत्व आणि इतिहास

Maharashtra News Live Update: टिटवाळा ड्रग्ज प्रकरणात आणखी एकाला अटक, अश्विनी पॉलच्या लिव्ह इन पार्टनरला बेड्या

४० मिनिटं विकेटकिपिंग, १ तास फलंदाजी; एमएस धोनी आयपीएलमध्ये कमबॅक करणार?

SCROLL FOR NEXT