Mumbai-Pune Expressway Car Fire Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Expressway Car Fire: मुंबई-पुणे महामार्गावर कारला भीषण आग; घटनेचा थरारक व्हिडिओ

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

Shivani Tichkule

Car Fire News: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग एवढी भीषण होती की त्यात कार पूर्णपणे जळून खाक झाला आहे. यामुळे महामार्गावर वाहतूकीची कोंडी झाली असून तब्बल १० किमी लांबीच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. (Latest Marathi News)

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली जवळ पुणे लेनवर ही दुर्घटना घडली असून या घटनेत कार जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कुठल्याही जीवीतहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र अग्नीशमन दलाला आग विझवण्यात अद्याप यश आलेले नाही. या घटनेमुळे महामार्गावर लांबच लांब वाहनाच्या रांगा लागल्याचं पाहायले पाहायला मिळाले. दरम्यान ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Pune News)

जुन्या महामार्गावर वाहतुक कोंडी

पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे नंतर आता जुना पुणे (Pune) मुंबई महामार्गवर देखील वाहतुक कोंडी झाली आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक जण बाहेरगावी आपल्या खाजगी वाहनाने निघाल्याने वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून (Police) 10-10 मिनिटांचे ब्लॉक घेऊन गाड्या विरुद्ध दिशेने सोडून ट्रॅफिक सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT