Mumbai-Pune Expressway Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताचा थरार, ५ वाहनं एकमेकांना धडकली; ४ कारचा चुराडा

Accident On Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भयंकर अपघात झाला. भरधाव बसने चार वाहनांना धडक दिली. या अपघातामध्ये अनेक जण जखमी झालेत.

Priya More
  • मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर बसने चार वाहनांना दिली जोरदार धडक

  • भाताण बोगद्याजवळ झाला अपघात

  • अपघतामध्ये पाचही वाहनांचे मोठं नुकसान

  • अपघातात ८ ते १० जण जखमी

सचिन कदम, रायगड

मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघाताची घटना घडली. एका बसने चार वाहनांना जोरदार धडक दिली. पुण्याच्या मार्गिकेवर ही घटना घडली. ५ वाहनांच्या अपघातामुळे पुण्याच्या मार्गिकेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघातामध्ये ८ ते १० जण जखमी झाले आहेत. जखमींमधील २ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातामध्ये चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- पुणे एक्स्प्रेसवर भाताण बोगद्यात भीषण अपघात झाला. एका भरधाव बसने चार वाहनांना धडक दिली. पुण्याच्या मार्गिकेवर हा अपघात झाला असून एक टेम्पो आणि तीन कारचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नसली तरी ८ ते १० जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. जखमींमधील २ जणांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातामुळे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक काही काळ ठप्प होती.

वर्ध्यामध्ये भीषण अपघात -

वर्ध्यामध्ये देखील भीषण अपघाताची घटना घडली. टिप्परला ट्रॅव्हलरने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॅव्हलरमधील १० ते १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. धडकेनंतर ट्रॅव्हलरच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. या अपघातामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले. ट्रॅव्हलरचा चालक वाहनातच अडकला आहे. घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेतली असून बचावकार्य सुरू आहे.

नागपूर-तुळजापूर मार्गावरील सेलूजवळील रमणा बसस्थानक परिसरात हा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवले. गुजरातहून नांदेडकडे जात असलेल्या ट्रॅव्हलरला हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी वर्ध्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF Rules 2026 : PF चे नियम बदलले! १५ ऑक्टोबरपासून CTC आणि टेक-होम सॅलरीत मोठे फेरबदल, पाहा तुम्हाला फायदा होणार की तोटा?

IND vs PAK Final: पाकिस्तान चारीमुंड्या चीत! भारताचा सुवर्णवेध, अभिषेक-तिलक चमकले

5 Best Anarkali Sets: गरब्यासाठी घागरा- चोळी नाही? मग आजच खरेदी करा घेरदार अनारकली सूट

Health Care: शरीराला आतून हळूहळू नुकसान पोहोचवतात 'या' ७ सवयी; आजच बदला तुमची लाइफस्टाइल

Maharashtra : शरद पवारांचं आमंत्रण अन् नरेंद्र मोदी पुन्हा बारामती दौऱ्यावर, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT