Mumbai-Pune Express Way Mumbai-Pune Express Way
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Express Way Traffic Jam : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सलग दुसऱ्या दिवशीही मोठी वाहतूक कोंडी, मज्जा करायला निघालेल्या नागरिकांचा हिरमोड

Traffic Jam News : बोरेघाटातील अमृतांजन कमानपासून खोपोलीकडे वाहनाच्या रांगा 24 तास उलटूनही कायम आहेत.

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

Raigad News : सलग सुट्ट्यांमुळे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील मंडळी पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. मात्र मज्जामस्ती करण्यासाठी निघालेल्या नागरिकांना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर कालपासून वाहतूक कोंडी कायम आहे. एक्सप्रेस वेवर दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. बोरेघाटातील अमृतांजन कमानपासून खोपोलीकडे वाहनाच्या रांगा 24 तास उलटूनही कायम आहेत. (Maharashtra News)

वीकेंड आणि 15 ऑगस्ट व पारसी न्यू इयरच्या सलग सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक मुंबई बाहेर पडत आहे. त्यामुळे शनिवारी दिवसभर व रात्री ते रविवारी सकाळपर्यंत वाहतूक कोंडी कायम आहे. बोरघाट वाहतूक पोलीस सतत वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.  (Latest Marathi News)

सलग सुट्टी असल्याने लोणावळा, महाबळेश्वर, कोल्हापूर अशा पर्यटन स्थळे जाऊन सुट्टीचा आनंद पर्यटक घेत आहेत. दरम्यान, वारंवार प्रशासनाच्या वतीने विनंती करूनही पर्यटक आपल्या खाजगी वाहनाने प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबईहून पुण्याकडील जाणाऱ्या लेनवर बोरघाटात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त नांदेड शहरातील श्री नरहरी नरसिंह मंदिरात विठ्ठल नामाचा गजर

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

SCROLL FOR NEXT