गिरीश कांबळे
आज शनिवारी मुंब्य्रातील शिवसेनेच्या शाखेवरुन शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. मुंब्य्रातील शिवसेना शाखा तोडल्यानंतर दोन्ही गटात वातावरण तापलं. या वादानंतर स्वतः उद्धव ठाकरे शाखेची पाहणी करण्यासाठी आले होते. मात्र, पोलिसांच्या विनंतीनंतर माघारी परतले. याच शिवसेना शाखा तोडण्यावरून पत्रकार परिषद घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. (Latest Marathi News)
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. 'आज पोलिसांची हतबलता दिसली. या सत्ताधाऱ्यांनी बारसू आंदोलकांवर लाठीचार्ज करायला लावला. वारकऱ्यांवरही लाठीचार्ज करायला लावला. मी मुद्दाम या ठिकाणी आलो. सत्ताधाऱ्यांना सत्तेची मस्ती चढली आहे. हे नेभळट असून चोर आणि गद्दार आहेत. हे नामर्द पण आहेत. अशी नामुष्की महाराष्ट्राला याआधी कधी आली नाही', असे ठाकरे म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'नोटीसीशिवाय कार्यालय पाडलं. ही शाखा कोणी पाडली? प्रशासनाने पाडली का तर नाही. दोन दिवसानंतर तिथे आमची शाखा असणार. शिवसेना ही एक आहे. दिवाळीमुळे संयम बाळगला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
'दरवेळी आमचा संयम आणि तुमचा यम हे चालणार नाही. त्यांनी जे डबडे ठेवले आहे, त्यास परवानगी आहे का? हे कंटेनरवाले आहेत. खरंतर ठाणेकर तगडे आहेत. मी धडा शिकवायला येणार नाही. मी महिन्याभरात सभा घेईल. ठाण्यात काही दिवसांनी महाविकास आघाडीची सभा घेईल. जानेवारीपर्यंत ही सभा घेणार आहे, असेही ठाकरे यांनी जाहीर केले.
'हातोडा मारणारे हे नकली शिवसैनिक असून ते लोकांसमोर जाणार नाहीत. मी कुठेही पोलिसांचा अनादर होईल असे वागलेलो नाही. लहान मुले आणि मातांवर याआधी मराठा आंदोलनावर लाठीचार्ज करायला लावला होता. पोलिसांची ही हतबलता आहे. सत्तेच्या माजावर आज शाखा पाडली, पुढच्या काळात घरं पाडतील, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.