Shivsena Dasara Melava Mumbai Police Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena Dasara Melava: शिवसेना दसरा मेळाव्यासाठी मुंबईत असा असेल कडेकोट बंदोबस्त

एकाच वेळी होणाऱ्या दोन मेळाव्यांना कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे.

सुरज सावंत

Shivsena Dasara Melava: शिवसेनेतील (Shivsena) दोन गटांमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमिवर मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे वांद्रे येथील बीकेसी मैदानात दसरा मेळावा घेत असून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क दादर या ठिकाणी होणार आहे.

याशिवाय दसऱ्याला देवीचं विसर्जन असल्यामुळे 20 हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. एकाच वेळी होणाऱ्या दोन मेळाव्यांना कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) जय्यत तयारी केली आहे.

पाहा व्हिडीओ -

तर उद्याच्या दसरा मेळाव्याच्या बंदोबस्तासाठी 3200 अधिकारी, 15 हजार 200 पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाचे 1500 जवान, एक हजार गृहरक्षक दल, शीघ्रकृती दलाच्या 20 पथके, 15 बॉम्ब शोधक व नाशक पथके तैनात करण्यात येणार आहेत.

दसरा मेळावा पोलीस बंदोबस्त नियोजन पुढीलप्रमाणे -

ठाकरे गट शिवाजी पार्क मेळावा -

2 पोलीस उपायुक्त DCP, 3 सहाय्यक पोलीस आयुक्त ACP, 17 पोलीस निरीक्षक, 60 सहाय्यक पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक, 420 पोलीस कर्मचारी.

65 पोलीस हवालदार, 2 RCP प्लॅटून, 5 सुरक्षा बल पथक, 2 शीघ्र कृती दल QRT, 5 मोबाईल वाहनं.

शिंदे गट BKC मेळावा -

4 पोलीस उपायुक्त DCP, 4 सहाय्यक पोलीस आयुक्त ACP, 66 पोलीस निरीक्षक, 217 सहाय्यक पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक, 1095 पोलीस कर्मचारी, 410 पोलीस हवालदार, यासह 8 RCP प्लॅटून, 5 सुरक्षा बल पथक, 5 शीघ्र कृती दल QRT, 14 मोबाईल वाहनं

यासह दोन्ही जागांवर -

बिनतारी संदेश यंत्रणा पथक

बॉम्ब स्कॉड (शोध पथक)

दुर्बीण वरून निरीक्षण पथक

गॅसस्कॉड

वज्र, वरुण जामर

CCTV व्हॅन

डॉगस्कॉड

याप्रमाणे मुंबई पोलिसांनी सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

Rahuri By-Election: पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं?

इराणकडून अमेरिकेची आर्थिक नाकेबंदी, तेल व्यापार चीनचे चलन युआनमध्ये करणार?

SCROLL FOR NEXT