Mumbai Police News Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai Police News: धुमस्टाईल बाईक चालवणाऱ्यांना दणका! मुंबई पोलिसांनी केली सर्वात मोठी कारवाई

Mumbai Police: धुमस्टाईल बाईक रायडर्स विरोधात मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे.

Gangappa Pujari

संजय गडदे, प्रतिनिधी...

Mumbai News: मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात तीन दिवसांपूर्वी एक बाईक वरून तीन जणांना बसवून जीवघेणे स्टंट करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी अशा बाईक रायडर्स विरोधात मोहीम तीव्र केली असून अशा बाईक रायडर्स विरोधात आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून महामार्गावर धूम स्टाईल बाईकर्सचा (Bike Riders) सुळसुळाट झालेला असून, काही जणांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्गावर काही तरुण बाईक रेस लावणार असल्याची माहिती खेरवाडी पोलिसांना मिळाली होती. या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकत बाइक रायडर्स विरोधातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 48 बाईक चालकासह एकूण 82 तरुणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेरवाडी पोलिसांनी पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावर अशा धूम स्टाईलने म्हणजे अतिवेगात रायडिंग करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली असून या सर्व आरोपींना वांद्रे सुट्टीकालीन न्यायालयात हजर केले जाणार आहे.

पोलिसांकडून वारंवार सुचना देवूनही धूम स्टाईलने बाईक चालवण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळेच पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांमधूनही स्वागत होत आहे. (Mumbai Police)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early Cancer Detection: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात? वेळेवरील निदानाने वाचेल तुमचा जीव

Do Deewane Shaher Mein OTT : मृणाल-सिद्धांतचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' ओटीटीवर कधी येणार? वाचा मोठे अपडेट

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Chicken Fry Recipe: घरीच कुरकुरीत चिकन फ्राय कसे बनवायचे?

SCROLL FOR NEXT