Mumbai Police 
मुंबई/पुणे

मुंबई पोलीस दलात कोट्यवधींचा महाघोटाळा! थेट पोलिसांच्याच पगारावर मारला दरोडा; मुख्य सूत्रधार अखेर अटकेत

Mumbai Police Payroll Scam : मुंबई पोलिसांच्या उत्तर प्रादेशिक विभागातील ६.४१ कोटी रुपयांच्या पेरोल घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अजय राठोडला गुन्हे शाखेने अटक केली. बनावट बँक खात्यांद्वारे वेतनाचा अपहार केल्याचा आरोप.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

मुंबई पोलिसांच्या उत्तर प्रादेशिक विभागात २०२० मध्ये झालेल्या वेतन वितरणातील (पेरोल) तब्बल ६.४१ कोटी रुपयांच्या घोटाळ्यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि तत्कालीन मुख्य लिपिक (हेड क्लर्क) अजय राठोड (वय ३९) याला मुंबई गुन्हे शाखेच्या (क्राइम ब्रांच) युनिट-१२ च्या पथकाने दहिसर परिसरातून अटक केली आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून अजय राठोड फरार होता. पोलीस सातत्याने त्याचा शोध घेत होते. अखेर गुन्हे शाखेने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. राठोडला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

वेगवेगळ्या नावाने बँक खाती उघडून अपहार

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, हा घोटाळा करण्यासाठी आरोपीने वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने बोगस बँक खाती उघडली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या अधिकृत खात्यातून या बनावट खात्यांमध्ये पैसे वर्ग केले जात होते.

डिसेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० आणि जून ते सप्टेंबर २०२० या कालावधीत वेतन वितरण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून आली होती. सखोल तपासात या तफावतीच्या माध्यमातून तब्बल ६.४१ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले.

पोलीस कर्मचारी नसतानाही लाटला पगार

वेतन वितरणातील अनियमितता लक्षात आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीदरम्यान या मोठ्या घोटाळ्याचा भंडाफोड झाला. तपासात १० प्रमुख व्यक्तींची नावे समोर आली. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, यातील काही व्यक्ती पोलीस दलात कार्यरत नसतानाही त्यांच्या नावाने नियमित पगार उचलला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणाच्या तपासात माजी प्रशासकीय अधिकारी रामकिशन गोस्वामी, नागेश तळवडेकर आणि विजय चव्हाण यांच्यासह मुख्य लिपिक अजय राठोड आणि लिपीक अमोल मेश्राम यांची नावे निष्पन्न झाली आहेत.

तीन आरोपी अद्याप फरार

या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी ऑगस्ट महिन्यात रामकिशन गणेश गोस्वामी याला अटक केली होती. आता मुख्य सूत्रधार अजय राठोडच्या अटकेमुळे तपासाला अधिक गती मिळाली आहे. मात्र, या प्रकरणातील इतर तीन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

६.४१ कोटी रुपयांच्या या पेरोल घोटाळ्यात पोलीस दलातील आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि अपहारातील रक्कम नेमकी कुठे वळवण्यात आली, या सर्व बाबींचा शोध मुंबई गुन्हे शाखा घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fennel Seeds Benefits: जेवणानंतर बडीशेप खाता? जाणून घ्या रोज बडीशेप खाण्याचे ७ आरोग्यदायी फायदे

Cabinet Meeting: अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत 10 टक्के आरक्षण; राज्य सरकारनं घेतले १० महत्त्वाचे निर्णय

आजोबा-पणजोबांची जमीन नक्की कुठे अन् किती आहे? एका क्लिकवर शोधा ७/१२ अन् जमिनीचा नकाशा

Maharashtra News Live Update: चाकणमधील कंपनीला भीषण आग

Honeymoon Destinations: डिसेंबरमध्ये हनिमूनचा प्लॅन करताय? ५ ड्रीम डेस्टिनेशन्स समोर परदेशही वाटेल फिका

SCROLL FOR NEXT