Mukesh Ambani Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking News : मुकेश अंबानी यांना पुन्हा धमकी; कुटुंबाला ८ वेळा फोनवरुन धमकी

अँटिलिया धमकीनंतर आता पुन्हा अंबानी कुटुंबाला धमकी आल्याचे समोर आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अँटिलिया धमकीनंतर आता पुन्हा अंबानी कुटुंबाला धमकी आल्याचे समोर आले आहे. यावेळी रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या (Hospital) डिस्प्ले क्रमांकावर धमकीचा फोन आला आहे. कॉलरने मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी दिली आहे. यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी याबाबत डीबी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

एकूण ८ धमकीचे कॉल आल्याचे सूत्रांनी सांगितले, पोलीस (Police) या कॉलची तपासणी करत आहेत. फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती मिळत आहे.

हे देखील पाहा

धमकी देणारा हा आरोपी हा मनोरुग्ण असल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपीने केलेल्या ८ फोनचा माग सायबर पोलीस घेत आहेत. डी बी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मागील वर्षी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती, त्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने आपल्या हाती घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशावरून एनआयएने या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT