Neil Somaiya Saam TV
मुंबई/पुणे

Breaking: किरीट सोमय्या यांचे पुत्र नील विरोधात मुंबई पोलिसांकडून तपास सुरू

किरीट सोमय्या यांचा मुलगा नील यांच्या मालकीच्या निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शनमध्ये PMC बँक घोटाळय़ातील आरोपी राकेश वाधवान हे भागीदारी असल्याचे आऱोप संजय राऊतांनी केले होते.

सुरज सावंत

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील (Neil Somaiya) यांची मुंबई पोलिसांच्या EOW ने नील सोमय्या विरोधात तपास सुरू केला आहे. वसई येथे जमीन खरेदी केल्याप्रकरणी नीलवर गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणात ईओडब्ल्यूने आतापर्यंत ७ जणांचे जबाब नोंदवले आहेत. EOW ने या प्रकरणातील तक्रारदाराचे जबाबही नोंदवले आहे जेणेकरून या प्रकरणाची तक्रार बारकाईने समजून घेता येईल.

राऊतांनी केलेले आरोप -

दरम्यान, किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा मुलगा नील यांच्या मालकीच्या निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शनमध्ये PMC बँक घोटाळय़ातील आरोपी राकेश वाधवान हे भागीदारी आहे. तसंच या प्रकल्पासाठी सोमय्यांनी 400 कोटींची जमीन साडेचार कोटींमध्ये विकत घेतल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता तसंच हे बाप, बेटे जेलमध्ये जाणार असून कोठडीचं सॅनिटायजेशन सुरु असल्याचंही राऊत म्हणाले होते.

मात्र, राऊतांचे हे सर्व आरोप सोमय्या यांनी फेटाळले होते. “नील वा माझा वाधवानशी संबंध नाही, पीएमसी बँकेशीही संबंध नाही. वास्तविक, पीएमसी बँकेतील घोटाळा मीच उघड केला होते. आम्हाला तुरुंगात टाकायचे तर खुशाल टाका. आम्ही चौकशीला आम्ही घाबरत नाही,” असं सोमय्या म्हणाले होते.

मात्र आता सोमय्यांच्या मुलाची सुरु असणारी चौकशी आणि काल झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावरती झालेली कारवाई यामुळे आता एकमेकांविरोधातील चौकशींची लढाई सुरु झाल्याच चित्र निर्माण झालं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

SCROLL FOR NEXT