Mumbai Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

Crime News : ब्रँडेड सिगारेटच्या व्यसनापायी 'तो' बनला अट्टल चोर; असा अडकला जाळ्यात

ब्रँडेड सिगारेट चोराला एम एच बी कॉलनी पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई : सध्या तरुणाईला सिगारेट ओढण्याच्या व्यसनाने गुरफटून टाकले आहे. अशातच चित्रपट कलाकारांचे अनुकरण करणारे तरुणही कमी नाहीत. आपल्या आवडत्या फिल्मी कलाकारांप्रमाणे ब्रँडेड सिगारेट ओढणे ही आजकालच्या तरुणाईची फॅशन बनली आहे. मात्र हे व्यसनं भागवन्यासाठी एक तरुण अशा ब्रँडेड सिगारेट चोरी करू लागल्याचा प्रकार नुकताच बोरिवली भागात उघडकीस आला आहे. (Latest Marathi News)

अशा ब्रँडेड सिगारेट चोराला एम एच बी कॉलनी पोलिसांनी राजस्थान मधून अटक केली आहे. महेंद्र कुमार मेघवाल असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पश्चिमेला नवागाव परिसरात राहणाऱ्या राकेश शेट्टी यांचे पान, विडी, सिगारेटचे घाऊक दुकान आहे.

8 डिसेंबर रोजी त्यांनी MHB पोलिस स्टेशनमध्ये (Mumbai Police) त्यांच्या दुकानातून लाखो रुपयांच्या ब्रँडेड सिगारेटची चोरी झाल्याची तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही आणि इतर तपासात महेंद्र कुमार मेघवालचे नाव पोलिसांना समोर आले तेव्हा तो राजस्थानातील पाली जिल्ह्यातील त्याच्या गावी गेल्याचे समोर आले.

पोलिसांनी तत्काळ त्याचे गाव गाठून त्याला अटक करून मुंबईला आणले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्यावर गुजरात, राजस्थान आणि मुंबईत अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो फक्त ब्रँडेड सिगारेट ओढत असे. त्यामुळे तो चोरी करू लागला. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT