Building Slab Collapse in Mumbai Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: दुर्दैवी! मुंबईत घराचा स्लॅब कोसळला, पस्तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू

दुर्दैवी! मुंबईत घराचा स्लॅब कोसळला, पस्तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू

Satish Kengar

>> संजय गडदे

Mumbai Latest News: मुंबईत घरे कोसळून दुर्घटना होण्याच्या घटना थांबायचे नाव घेत नाही. पावसाला सुरुवात झाल्यापासून मुंबईच्या मालाड, घाटकोपर विद्या विहार अशा विविध ठिकाणी घरे कोसळून सात पेक्षा अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.

या घटना ताज्या असतानाच मुंबईच्या कांदिवली पूर्वेकडील बानडोंगरी अशोक नगर परिसरातील एक घर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एक पस्तीस वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

किसन धुला, असं मयत व्यक्तीचे नाव आहे. दुर्घटना घडल्यानंतर शेजाऱ्यांनी गंभीर जखमी अवस्थेतील किसन धुळला यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. (Latest Marathi News)

घराचा पोटमाळा कोसळला कोसळून दीड महिन्याच्या बाळाचा दुर्देवी मृत्यू

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत बोरिवलीत घराचा पोटमाळा कोसळला. ज्यामध्ये दीड महिन्याच्या बाळाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरीवलीच्या गणपत पाटीलनगर येथे हा प्रकार घडला. बाळ झोपेत असताना अचानक पोटमाळा कोसळला आणि या दुर्घटनेत दीड महिन्यांच्या आर्यन पालचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC Election : एकनाथ शिंदेंचा मित्रपक्ष भाजपलाच जोरदार धक्का; डोंबिवलीत मोठी उलथापालथ

Maharashtra Live News Update : मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या, पुण्यातील मराठा सेवकांची मागणी

Rupali Thombare Photos: फ्रायरब्रँड नेत्या, रुपाली पाटील ठोंबरेंविषयी 'या' 6 गोष्टी माहित आहेत का?

फलटण डॉक्टर प्रकरणी काँग्रेस आक्रमक; वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा|VIDEO

Politics: धुळ्यात मोठी राजकीय घडामोड, भाजपला एकनाथ शिंदेंकडून जोरदार दणका; बड्या नेत्यांनी हाती घेतलं 'धनुष्यबाण'

SCROLL FOR NEXT