एसीबी करणार परमबीर सिंगविरोधात खुली चौकशी; गृहविभागाची परवानगी
एसीबी करणार परमबीर सिंगविरोधात खुली चौकशी; गृहविभागाची परवानगी Saam Tv
मुंबई/पुणे

एसीबी करणार परमबीर सिंगविरोधात खुली चौकशी; गृहविभागाची परवानगी

सूरज सावंत

मुंबई - मुंबईचे Mumbai माजी पोलिस Police आयुक्त परमबीर सिंग Parambir Singh यांच्याविरोधात खुली चौकशी करण्याची परवानगी गृहविभागाकडून देण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) पोलीस निरीक्षक अनुप डांगे Anup Dange यांच्या तक्रारीप्रकरणी सिंग यांच्याविरोधात खुली चौकशी Inquiry करण्याची परवानगी गृह विभागाकडे मागितली होती.

 डांगे यांच्या तक्रारीनुसार, २३ नोव्हेंबर २०१९ ला गावदेवी येथील डर्टी बन्स पब रात्री उशीरापर्यंत सूरू असल्यामुळे तो बंद करण्यासाठी गावदेवी पोलीस तेथे गेले होते. त्यावेळी तेथे दोन गटांमध्ये सुरू असलेल्या मारहाणीप्रकरणी प्रसिद्ध हिरे व्यापारी व निर्माता भरत शहाचा नातू यश त्याचे २ मित्र व ३ विरोधक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यावेळी कारवाई करण्यासाठी गेलेले पोलीस नाईक संतोष पवार यांना देखील मारहाण करण्यात आली होती. इतर पोलिसांनी मध्यस्थी करून संतोष  पवार यांची सुटका केली होती. त्यानंतर यश व त्याच्या काही मित्रांना घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. 

हे देखील पहा -

जीतू नवलानीचे  याप्रकरणी आरोपी म्हणून नाव घेण्यात आले होते. या घटनेनंतर तत्कालीन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक असलेल्या परमबीर सिंग यांनी याप्रकरणी कोणताही संबंध नसतानाही त्यांना एसीबी कार्यालयात बोलावले असा आरोप डांगे यांनी लेखी तक्रारीत केला आहे.

त्यानंतर फेब्रुवारी,२०२० मध्ये परमबीर सिंग मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी जीतूच्या सांगण्यावरून डांगे यांची नियंत्रण कक्षात बदली केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी  डांगे यांनी गावदेवी अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर डांगे यांनी या प्रकरणी टाकलेल्या एका संदेशाची दखल घेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

याप्रकरणी फेब्रुवारीमध्ये गृहविभागाला पत्र लिहून याप्रकरणी चौकशीची मागणी करण्यात आली होती. डांगे यांनी परमबीर सिंग यांचे पब मालकाशी असलेल्या संबंध व त्यांच्यावर टाकण्यात आलेल्या दबावाप्रकरणी, तसेच भष्टाचाराप्रकरणी चौकशीची केली होती. तक्रारीनंतर हे प्रकरण महासंचालक संजय पांडे यांच्याकडे चौकशीसाठी सुपूर्त केले होते.

पण त्यांनी याप्रकरणी चौकशीला नकार दिल्यानंतर आता एका समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. याशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी डिस्क्रीट इन्क्वायरीला सुरूवात केली होती. चौकशीत पुढे आलेल्या काही तथ्यांनंतर याप्रकरणी खुली चौकशी करण्यासाठी एसीबीने गृहविभागाकडे मागणी केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : आनंदाची बातमी! यंदा मान्सून लवकर धडकणार, परिस्थिती अनुकूल

Pune Crime : चोरट्यांनी लांबवीले ७८२ ग्रॅम दागिने; पुण्यातील प्रख्यात डॉक्टरच्या घरात चोरी

वैशाली दरेकरांच्या रॅलीत विवेक खामकरांची दांडी, ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र', शिंदे गटाच्या वाटेवर?

Team India Squad: टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा! या १५ खेळाडूंना मिळालं स्थान

Washim Temperature : एप्रिलअखेर वाशीम जिल्ह्यात तापमान ४० अंशाच्या पार!

SCROLL FOR NEXT