Mumbai News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईत इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, घटनेत ४ जखमी; घटना सीसीटीव्हीत कैद

Vishal Gangurde

संजय गडदे

Mumbai News: मुंबईतील लिप्ट सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील ओशिवरा भागातील एका इमारतीमधील लिफ्ट कोसळून अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लिफ्ट दुर्घटनेची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेकडील ओशिवरा भागातील अमन सोसायटीच्या इमारत क्रमांक आर सहा क्रमांच्या इमारतीची लिफ्ट कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहे.

या दुर्घटनेतील जखमींवर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. इमारतीमधील रहिवासी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी या सर्व जखमींना लिफ्टमधून बाहेर काढलं.

अमन सोसायटीतील आर 6 क्रमांकाची इमारत ही 12 मजल्याची आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली येताना अचानक लिफ्ट कोसळली. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले.

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची पोलिसांनी दखल घेतली आहे. ओशिवरा पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

लिफ्ट अपघातात 10 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतील मानखुर्द येथील एका गृहनिर्माण संस्थेतील लिफ्टमध्ये बिघाड झाल्याने दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रुद्र बर्‍हाटे असं मृत मुलाचे नाव आहे. मृत्यूच्या महिन्याभरातनंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी लिफ्ट कंत्राटदार आणि तंत्रज्ञ यांच्यासह गृहनिर्माण सोसायटी समितीचे सचिव, समिती सदस्य आणि खजिनदार यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT