मुंबई/पुणे

सावधान! मुंबईतील समुद्रात चार महिन्यात २४ वेळा भरती; उसळणार साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा, हवामान विभागाचा अलर्ट

Monsoon Alert: जून ते सप्टेंबर २०२६ दरम्यान मुंबईत २४ मोठ्या भरती येण्याची शक्यता आहे. लाटांची उंची ४.५ मीटरपेक्षा जास्त वाढण्याची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभाग (IMD) आणि मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना समुद्रकिनाऱ्याजवळ न जाण्याचा इशारा दिला आहे.

Bharat Jadhav

  • जून ते सप्टेंबर दरम्यान मुंबईत २४ वेळा मोठी भरती येणार आहे.

  • समुद्रात ४.५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

  • १६ जुलै २०२६ रोजी सर्वाधिक उंच भरतीची नोंद होण्याचा अंदाज

पुढील काही तासांतच मान्सून केरळमध्ये दाखल होत असून महाराष्ट्रातही पावसाचे आगमन होणार आहे. मात्र यंदा अल निनोचा प्रभाव असल्याने पाऊस काळ कमी असल्याचं सांगण्यात येत आहे. यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीदरम्यान मुंबईतील अरबी समुद्रात तब्बल 24 वेळा मोठी भरती असणार आहे. भरती दरम्यान समुद्रामध्ये साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

हवामान विभागाने समुद्रातील भरतीची तारीख आणि वेळ यासह भरती दरम्यान समुद्रात उसळणाऱ्या लाटांची उंचीदेखील सांगण्यात आली आहे. त्यानुसार यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक उंचीच्या लाटा दिनांक 16 जुलै 2026 रोजी उसळणार आहेत. मोठी भरती असण्याच्या सर्व दिवशी भरती कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिनाऱ्या जवळ जाणे टाळावे. तसेच या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

जून 2026 मध्ये 6 वेळा समुद्राला भरती

रविवार, दि. १४.०६.२०२६ सकाळी – ११.२४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६५

सोमवार, दि. १५.०६.२०२६ दुपारी – १२.१४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८०

मंगळवार, दि. १६.०६.२०२६ दुपारी – ०१.०५ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८७

बुधवार, दि. १७.०६.२०२६ दुपारी – ०१.५५ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८६

गुरुवार, दि. १८.०६.२०२६ दुपारी – ०२.४४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.७९

शुक्रवार, दि. १९.०६.२०२६ दुपारी – ०३.३२ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६४

जुलै 2026 मध्ये 6 वेळा भरती

सोमवार, दि. १३.०७.२०२६ सकाळी – ११.१४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५३

मंगळवार, दि. १४.०७.२०२६ दुपारी – १२.०४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.७३

बुधवार, दि. १५.०७.२०२६ दुपारी – १२.५१ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८५

गुरुवार, दि. १६.०७.२०२६ दुपारी – ०१.३६ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८९

शुक्रवार, दि. १७.०७.२०२६ दुपारी – ०२.१९ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८३

शनिवार, दि. १८.०७.२०२६ दुपारी – ०३.०० वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६६

ऑगस्ट 2026 मध्ये 5 वेळा समुद्राला भरती

बुधवार, दि. १२.०८.२०२६ सकाळी – ११.४८ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६८

गुरुवार, दि. १३.०८.२०२६ दुपारी – १२.२८ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८१

शुक्रवार, दि. १४.०८.२०२६ दुपारी – ०१.०७ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८३

शनिवार, दि. १५.०८.२०२६ दुपारी – ०१.४४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.७३

रविवार, दि. १६.०८.२०२६ दुपारी – ०२.१९ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५०

सप्टेंबर 2026 मध्ये 7 वेळा समुद्राला भरती

गुरुवार, दि. १०.०९.२०२६ सकाळी – ११.२६ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५७

शुक्रवार, दि. ११.०९.२०२६ दुपारी – १२.०० वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६५

शनिवार, दि. १२.०९.२०२६ दुपारी – १२.३४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६१

रविवार, दि. १३.०९.२०२६ मध्यरात्री – ०१.०२ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५१

सोमवार, दि. २८.०९.२०२६ मध्यरात्री – ००.३८ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५१

मंगळवार, दि. २९.०९.२०२६ मध्यरात्री – ०१.१४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५९

बुधवार, दि. ३०.०९.२०२६ मध्यरात्री – ०१.५३ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५६

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early cancer symptoms: तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्येच का होतं कॅन्सरचं निदान? डॉक्टरांनी सांगितलं यामागचं कारण

सकाळी नाश्त्याला प्या गरमा गरम गाजर-मशरूम सूप; झटपट बनवा ही सोपी रेसिपी

Goa Fort : गोवा ट्रिपमध्ये करा इतिहासाची सफर, 'हा' भव्य किल्ला पाहायला विसरू नका?

Maharashtra News Live Update: अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय वडूजला व्हावे, जनसंघर्ष समितीचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू

Crime: १७ वर्षीय मुलीवर बॉयफ्रेंडकडून बलात्कार, बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या; अमरावती हादरले

SCROLL FOR NEXT