संजय गडदे, प्रतिनिधी...
Mumbai Food Poisoning: मुंबईच्या अंधेरी परिसरातून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. अंधेरी पूर्व परिसरातील पंप हाऊस भागात पाच तरुणांना अन्नातून विषबाधा झाली आहे यात एकाचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेकडील पालिकेच्या ट्रामा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजधानी मुंबईतील (Mumbai) अंधेरी (Andheri) भागातून पाच कामगारांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या कामगारांना सुट्टी असल्यामुळे हे सर्व कामगार जेवण करून दरवाजा बंद करून झोपी गेले. मात्र दुसऱ्या दिवशी दिवसभर कामगारांनी दरवाजा उघडला नसल्यामुळे शेजाऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना कळवले.
पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत पाहिले असता एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता तर चार जण अत्यवस्थ स्थितीत आढळून आले. एमआयडीसी पोलिसांनी ताबडतोब या चारही जणांना महापालिकेच्या जोगेश्वरी पूर्वेकडील ड्रामा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून यातील दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे समजते या सर्वांवर रुग्णालयात आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी ट्रामा केअर रुग्णालय प्रशासनाने मृत पावलेल्या तरुणाचा फॉरेन्सिक अहवाल तपासून पाहिला असता अन्नातून विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. चौघांमधील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी एडीआर दाखल केला असून यात काही घातपात आहे का? याचा देखील पोलीस तपास करत आहेत.(Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.