संजय गडदे, साम टीव्ही मुंबई
मुंबईत रस्त्यावर दारू पिणाऱ्यांची महिलांनी खराट्यानं झोडपल्याचं समोर आलंय. ही घटना कांदिवली पश्चिमेकडील लालजीपाडा परिसरात घडली आहे. आता महिलांनी दारूड्यांची धुलाई केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असताना देखील एक घोळका दारू पित होता. याचा आजुबाजूने येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याचं समोर आलंय.
दारुड्यांची खराट्यानं धुलाई
याबाबत सविस्तर वृत्त असं की, मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील लालजीपाडा परिसरात रस्त्यावर दारू पिणाऱ्या टोळक्याला (Mumbai news) महिलांकडून मारहाण करण्यात आलीय. मागील अनेक दिवसांपासून नागरिकांकडून याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येत होती. मात्,र पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जातोय. सततच्या प्रकाराला वैतागून महिलांनी थेट झाडू हातात घेतला अन् दारूड्यांवर हल्लाबोल केलाय.
महिलांनी भररस्त्यात चोपलं
कांदिवलीमध्ये बुधवारी रात्रीच्या वेळी रस्त्यावर बिअर शॉपी समोरच एक टोळकं नेहमीप्रमाणे दारू पित बसलं (drinking liquor on road) होतं. तेव्हा संतापलेल्या महिला स्वतः रस्त्यावर उतरल्या. त्यांनी हातात झाडू घेऊन या दारूड्यांना बेदम मारहाण केल्याचं समोर आलंय. याच रस्त्यावरून जाणाऱ्या मुली, महिला आणि तरुणींना दारू पिणाऱ्यांकडून सातत्याने त्रास (fight video) दिला जात होता. याविषयी अनेकदा नागरिकांना पोलिसांत तक्रार देखील केली होती. शेवटी कंटाळलेल्या महिला स्वत:च रस्त्यावर उतरल्या अन् त्यांनी या दारूड्यांना चांगलाच धडा शिकवला आहे.
घटनेचा व्हिडिओ समोर
कांदिवलीत बुधवारी २१ ऑगस्ट रोजी रात्री महिलांचा रूद्रावतार पाहायला मिळाला आहे. दारूड्यांविषयी अनेकदा तक्रार करून देखील पोलिसांनी दखल घेतली नाही, असा आरोप या महिलांकडून केला (Viral news) जातोय. त्यामुळे वैतागलेल्या महिलांनी दारुड्यांची खराट्यानं धुलाई करत त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. मुंबईतील या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. या दारूड्यांमुळे रस्त्यावरून जाताना महिला आणि तरूणींना मोठा त्रास सहन करावा लागत होता. परंतु, आता या घटनेमुळे दारूड्यांना चांगलाच वचक बसेल, अशी शक्यता वर्तवली जातेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.