Mumbai news  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईतील मार्वे समुद्रात ५ मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, बचावकार्य सुरू

Mumbai News: मालाडच्या मार्वे समुद्रात पाच मुले समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे

Mumbai News: मुंबईतील वांद्रे येथे एक महिला समुद्राच्या पाण्यात बुडाल्याची घटना ताजी असताना मालाडच्या मार्वे समुद्रात पाच मुले समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. समुद्रात बुडालेल्या दोघांना वाचविण्यात यश आलं आहे. तर तिघांचा शोध सुरू आहे. (Latest Marathi News)

मुंबईच्या मालाड मार्व समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या बारा ते पंधरा वर्षे वयोगटातील पाच मुले समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुडालेल्या पाच मुलांपैकी दोघांना वाचवण्यात यश आले आहे. तीन मुले अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचा काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालवणी परिसरातील ही पाच मुले मालाड मार्वे समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. या मुलांनी आंघोळ करण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ही पाचही मुले बुडू लागली. समुद्रकिनाऱ्यापासून साधारणपणे अर्धा किलोमीटर आत खोल समुद्रात ही मुले बुडाली. यातील दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे.

कृष्णा जितेंद्र हरिजन (सोळा वर्षे ) आणि अंकुश भारत शिवरे (तेरा वर्ष ) या दोन मुलांना वाचवण्यात यश आले आहे. तर शुभम राजकुमार जयस्वाल (बारा वर्ष), निखिल साजिद कायमकूर (तेरा वर्ष ), अजय जितेंद्र हरिजन (बारा वर्ष) ही तीन मुले बेपत्ता असून कोस्टगार्डचे जवान अग्निशमन दलाचे जवान महापालिकेचे जीव रक्षक आणि कोस्टगार्डचे जवान समुद्रात बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेत आहे.

बँड स्टँड येथील समुद्रात महिला बुडाली

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईच्या वांद्रे पश्चिमेकडील बँड स्टँड परिसरात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांपैकी एक महिला समुद्रात बुडाल्याची घटना घडली. महिला दगडावरून पाय घसरून समुद्रात बुडाली असल्याची माहिती पुढे आली होती. ज्योती सोनार (२७ वर्ष)असं समुद्रात बुडालेल्या महिलेचे नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT