Mumbai News Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai News : मुंबई विमानतळावर मोठी कारवाई, १५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; विदेशी नागरिकाने गिळल्या ७७ कॅप्सुल

Mumbai Crime News : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई करत तब्बल १५ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. कोट डायव्हरी (Cote D'ivore) देशाच्या नागरिकाने अमली पदार्थांच्या ७७ कॅप्सुस गिळल्या होत्या.

Sandeep Gawade

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई करत तब्बल १५ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. कोट डायव्हरी (Cote D'ivore) देशाच्या नागरिकाने अमली पदार्थांच्या ७७ कॅप्सुस गिळल्या होत्या. त्या शस्त्रक्रीया करून बाहेर काढण्यात आल्या आहेत. त्याच्याकडून एकूण १ कीलो ४६८ ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला अमली पदार्थ तस्करीची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर कोट डायव्हरी (Cote D'ivore) देशाचा नागरिक मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याची कसून चौकशी केली असता भरलेल्या कॅप्सुल गिळल्याच त्यांने कबूल केलं. त्यानंतर त्याला जे जे रुग्णालयात दाखल करून कॅप्सुल बाहेर काढल्या. तब्बत ७७ कॅप्सुल त्याने गिळल्या होत्या. त्या जप्त करण्यात आल्या आहेत.

विनापरवाना मद्य विक्री प्रकरणी महिलेसह दोघांना अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने डोंबिवलीतील गेल्या आठवड्याभरात धडक कारवाई करत विनापरवाना देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. या कारवाई दरम्यान दोघांना अटक करण्यात आली असून संशयित आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. डोंबिवली पश्चिमेकडील मच्छी मार्केट परिसरात एक महिला देशी-विदेशी दारू विक्री करत असल्याची माहिती डोंबिवलीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती, त्यावरून ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

चर्चा फिस्कटली पुन्हा युद्ध पेटणार? ट्रम्पनंतर नेत्यानाहूंचाही आक्रमक पवित्रा

SCROLL FOR NEXT