Joshi Bedekar College News Saamtv
मुंबई/पुणे

Joshi Bedekar College News: NCC विद्यार्थी मारहाण प्रकरणात मोठी अपडेट! पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा दाखल

Thane News: ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आली होती.

विकास काटे, ठाणे

Thane News: ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली असून ठाणे नगर पोलिसांनी अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील (Thane) बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात NCC च्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. कॉलेजच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्त असे NCC चे प्रशिक्षण देण्यात येते.

यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षाही होते, मात्र मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या अमानवी शिक्षेवर संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी आता ठाणे नगर पोलिसांनी अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची अद्याप कोणीही तक्रार केली नसल्याने पोलिसांनी स्वतःहून हा गुन्ह दाखल केला आहे.

सध्या कलम 323 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे; मात्र तक्रार आल्यानंतर चौकशी करून याबाबत आणखी गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे पोलिसानी स्पष्ट केले. या प्रकरणात मारहाण झालेल्या 10 विद्यार्थ्यांचा तसेच मारहाण करणाऱ्या युनिट हेडचा जबाब पोलिसांनी नोंदविला असून महाविद्यालय प्रशासनाचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. मात्र महाविद्यालय प्रशासन यांनीही तक्रार दाखल केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT