SOLE BREADWINNER DELIVERY BOY TRAGIC ACCIDENT DEATH NEWS AND UPDATES  saam tv
मुंबई/पुणे

Accident News : घरात एकटा कमावता, महिनाभरानंतर कामावर परतला अन् विपरीत घडलं; डिलिव्हरी बॉयचा करुण अंत

महिनाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा कामावर रुजू झालेल्या डिलिव्हरी बॉयचा अपघातात मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली.

Saam Tv

अख्ख्या घराची जबाबदारी एकट्याच्या खांद्यावर होती. एकमेव कमावता मुलगा. डिलिव्हरी बॉयचं काम करायचा. महिनाभर विश्रांतीनंतर घराची जबाबदारी असल्यानं तो पुन्हा कामावर जायला निघाला. कामाचा पहिलाच दिवस त्याच्या आयुष्यातील अखेरचा दिवस ठरला. ऑर्डर पोहोचवण्यासाठी गेलेल्या सूरजचा अपघात झाला. यात तो मृत्युमुखी पडला. घराचा एकमेव आधार हरपला. त्यामुळं हळहळ व्यक्त होत आहे. उल्हासनगरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली.

उल्हासनगरच्या कॅम्प नंबर ४ मधील महादेव नगर परिसरात गुरुवारी सकाळी हा भीषण अपघात झाला. डिलिव्हरी बॉयचं काम करणारा ३२ वर्षीय सूरज ऑर्डर पोहोचवण्यासाठी गेला. एका ट्रकच्या बाजूने जात असताना त्याची दुचाकी घसरली आणि तो खाली पडला. ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्यानं तो गंभीर जखमी झाला.

या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे नगरसेवक निलेश बोबडे आणि निखिल बिजवे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सूरजला जखमी अवस्थेत उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

घराचा एकमेव आधार हरपला

३२ वर्षांच्या सूरजला तीन बहिणी आहेत. तो घराचा एकमेव आधार होता. डिलिव्हरी बॉयचं काम करायचा. काही कारणामुळं त्यानं महिनाभराची विश्रांती घेतली होती. पण घरात एकमेव कमावता असल्यानं अधिक काळ घरात बसून राहणं कठीण होतं. त्यामुळं त्यानं पुन्हा डिलिव्हरी बॉयचं काम करण्याचं ठरवलं. पहिल्याच दिवशी तो घरातून कामासाठी बाहेर निघाला. ग्राहकाला ऑर्डर पोहोचवण्यासाठी दुचाकीवरून निघाला. त्याचवेळी ट्रकच्या बाजूने जात असताना दुचाकी घसरली आणि तो खाली पडला. तो ट्रकच्या मागील चाकाखाली सापडला. यात तो गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत उशिर झाला होता.

घरातला एकमेव कर्ता मुलगा गमावल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तीन बहि‍णींचा आधार हरपल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या अपघाताची नोंद विठ्ठलवाडी पोलिसांत करण्यात आली आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

नांदेडमध्ये कार-कंटेनरचा अपघात, १८ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू

नांदेडमध्ये कार आणि कंटेनरच्या धडकेत १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर २० वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. धर्माबाद-बाभळी फाटा मार्गावर हा अपघात झाला. श्रीनाथ येवतीवाड (वय १८) आणि धनराज लखमावाड (वय २०) हे दोघे कारमधून जात होते. त्याचवेळी कार आणि कंटेनरची धडक झाली. या भीषण अपघातात श्रीनाथचा मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला धनराज गंभीर जखमी झाला. धनराजला स्थानिकांनी तातडीने धर्माबाद येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या अपघाताची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blocked Nose In Winter : थंडीमुळे नाक बंद झालंय? लगेच करा 'हे' ३ घरगुती उपाय, मिनिटांत घ्याल मोकळा श्वास

Gold Rate Today : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, १ तोळ्यासाठी किती मोजावे लागणार? वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

महिलांसाठी मुनिया पैठणी साडीच्या लेटेस्ट डिझाईन्स, 5 पॅटर्न्स

Central Railway : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्यरात्री विशेष ब्लॉक; लोकलच्या वेळापत्रकात बदल, एक्स्प्रेस गाड्यांवरही परिणाम

BJP News: मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीनंतर भाजपमध्ये मंत्र्यांची झाडाझडती, कामाचा अहवाल मागवला

SCROLL FOR NEXT