Rahul Kanal Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईतील शिंदेसेनेच्या बड्या नेत्याच्या जीवाला धोका, घर अन् ऑफिसची ३ वेळा रेकी; सलमान खानसोबत जवळचे संबंध

Rahul Kanal News: टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती उघड होत आहे. अशातच आता शिंदेसेनेच्या बड्या नेत्याने जीवाला धोका असल्याचे म्हणत पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली.

Priya More
  • मुंबईत शिंदेसेनेचे नेते राहुल कनाल यांच्या जीवाला धोका

  • राहुल कनाल यांच्या घराची आणि ऑफिसची ३ वेळा रेकी

  • राहुल कनाल यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे मागितली सुरक्षा

  • सलमान खान यांच्याशी जवळचे संबंध असलेल्या नेत्याला धमकीची भीती

सूरज मसूरकर, मुंबई

अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास सध्या मुंबई पोलिस करत असून आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे. टायगर श्रॉफवर गोळीबार करण्यापूर्वी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीच्या घराची आरोपींनी रेकी केली असल्याची माहिती समोर आली. अशातच आता मुंबईतील शिवसेना शिंदेसेनेच्या बड्या नेत्याने थेट मुंबई पोलिसांना पत्र लिहून आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली. त्यांनी पोलिसांना त्यांच्या घर आणि ऑफिसची रेकी करण्यात आली असल्याचे सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदेसेनेचे नेते राहुल कनाल यांच्या जीविताला धोका आहे. मुंबई पोलिस आयुक्तांकडे पत्र लिहून त्यांनी सुरक्षेची मागणी केली. आपल्या घराची आणि ऑफिसची ३ वेळा रेकी करण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी पोलिसांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.

राहुल कनाल यांचे बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्याशी जवळचे संबंध आहेत. टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर राहुल कनाल यांनी आपल्या जीविताला धोका असल्याची भीती व्यक्त केली. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींशीही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. याआधी ३ वेळा राहुल कनाल यांनी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली होती.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा करण्यात आला आहे. टायगर श्रॉफवर गोळीबार करण्यापूर्वी आरोपींनी अभिनेता अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्या घरांची रेकी करण्यासाठी रिक्षाचालकांची मदत घेतली होती. आरोपींना कमी सुरक्षा असलेल्या सेलिब्रिटीला लक्ष्य करण्याचे शूटर्सना निर्देश असल्याची पोलिस सूत्रांनी माहिती दिली.

आम्हाला अभिनेत्यांची घर पाहायची आहेत आणि फोटो काढायचे आहेत असे सांगत रिक्षाचालकांच्या मदतीने आरोपींना मोठमोठ्या अभिनेत्यांच्या घरचा पत्ता मिळाला होता. आरोपी रिक्षाचालकांच्या मदतीने वांद्रे परिसरात फिरले आणि या अभिनेत्यांच्या घरांची रेकी केली असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रोह्याचे ग्राम दैवत श्री धावीर महाराजांचा पालखी सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न

Grooming Tips For Men: दाढी करण्यासाठी गंजलेला किंवा जुना रेझर वापरण्याचे गंभीर धोके, पुरूषांनी वेळीच घ्या काळजी

Diwali Ladoo Recipe : रव्याचे लाडू कडक होतात? 'या' सोप्या ट्रिकने बनवा मऊसूत लाडू, तोंडात टाकताच विरघळतील

Shocking : संभाजीनगर हादरले! बाप लेकाची मध्यरात्री निर्घृण हत्या; नेमकं प्रकरण काय? वाचा

Turmeric Bath Benefits: हळदीच्या पाण्याने आंघोळ करा, त्वचेचे इन्फेक्शन, खाज आणि मुरुम होतील कमी

SCROLL FOR NEXT