Mumbai News Saam tv
मुंबई/पुणे

Vido: चुनाभट्टीत रस्ता खचला; दुचाकी आणि चारचाकी वाहने पडली खड्ड्यात

Mumbai News: मुंबईतील चुनाभट्टीतील वसंत दादा पाटील इंजिनीअर महाविद्यालयासमोरील एक रस्ता खचल्याची घटना घडली आहे.

सूरज सावंत

Mumbai: मुंबईत पुन्हा एकदा रस्ता खचल्याची घटना घडली आहे. मुंबईतील चुनाभट्टीतील वसंत दादा पाटील इंजिनीअर महाविद्यालयासमोरील एक रस्ता खचल्याची घटना घडली. ही घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेत रस्त्याच्या कडेला असलेली अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने खड्ड्यात पडली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, चुनाभट्टीतील वसंत दादा पाटील इंजिनीअर महाविद्यालयासमोरील एसआरए इमारतीचा रस्ता बुधवारी सकाळी खचला. या घटनेत स्थानिक रहिवाशांनी रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने खड्यात पडल्या.

रस्ता खचताच आसपासच्या इमारतींमधील नागरिकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. पोलीस, अग्निशमन दल आणि मुंबई महानगरपालिका कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. तसेच या इमारतीमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे.

मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळ रस्ता खचला

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळ रस्ता खचल्याची घटना घडली आहे. खोदकामामुळे मेट्रो स्टेशनजवळ रस्ता खचल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी खोदकाम करणाऱ्या चांडक बिल्डरच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

नाल्याच्या चेंबरजवळ खोल खोदकाम केल्याने त्याच्या भिंतीला तडे गेले होते. यामुळे मागाठाणे मेट्रो स्थानकाच्या पायऱ्या आणि एस्केलेटरचा पाया आणखी कोसळण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला होता. या घटनेनंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP आमदाराच्या नावाचं बनावट लेटरहेड; मंजूर कामाऐवजी काढला नव्या कामांचा GR, शिंदे सेनेच्या माजी आमदाराचा कारनामा

शाळेच्या सहलीला गेले, ५५-६० विद्यार्थ्यांना विषबाधा; ठाण्यातील घटनेने खळबळ, पालकांमध्ये भीती

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रामरक्षा पठण आणि महाआरती

Akkha Masoor Masala Recipe: घरीच बनवा हॉटेलस्टाईल स्वादिष्ट अख्खा मसूर मसाला; जाणून घ्या सोपी रेसिपी

Healthy Diet : कडधान्य की पालेभाज्या? पावसाळ्यात शरीरासाठी काय योग्य, वाचा

SCROLL FOR NEXT