Chhagan bhujbal News  saam tv
मुंबई/पुणे

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ रुग्णालयात दाखल; काय आहे कारण?

भुजबळ यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : एकीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भुजबळ यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. (Chhagan Bhujbal Latest News)

छगन भुजबळ यांना मागील तीन दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत आहे. त्यामुळेच त्यांना आज मुंबईतील रुग्णालयात दाखल केलं असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी दिली आहे. सध्या भुजबळ यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात गर्दी करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे विविध कार्यक्रमात मास्क वापरत असल्याचे दिसून येत होते. आज अस्वस्थ वाटू लागल्याने तसेच दिवसांपासून व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. आज संध्याकाळीचं रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचे माहिती आहे.

शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती खालावल्याने  31 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील आठ दिवसांपासून शरद पवार यांच्यावर ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरु होते.

त्यानंतर आज सकाळी वाजता शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर सकाळी साडे दहा वाजता शरद पवार मुंबईतील आपल्या सिल्वर ओक या निवासस्थानी रवाना झाले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा हाफ एन्काउंटर, पोलिसांनी दोन्ही पायांवर झाडल्या गोळ्या

Maharashtra News Live Update : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांचा विजय

Baba Bhide Bridge : पुण्यातील बाबा भिडे पूल ६ जुलैपर्यंत राहणार बंद, नेमकं कारण काय?

Vidhan Parishad Result 2026: महायुतीचा दणदणीत विजय, मविआची मते फुटली; सर्व १७ जागांचा संपूर्ण निकाल एकाच क्लिकवर

Weekly Horoscope: या राशींना जुन्या गुंतवणूकीतून फायदा होणार आहे, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT