Maharashtra Latest News:  Saamtv
मुंबई/पुणे

Arun Gawli News: 'डॅडी'च्या संदर्भातील कागदपत्रे गहाळ! डॉन अरुण गवळीवरील मोक्का कारवाईची फाईल सापडेना; गुन्हे शाखेची माहिती

Maharashtra Latest News: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आणि त्याच्या साथीदारांवर खंडणी प्रकरणी लावण्यात आलेल्या मोक्का प्रकरणातील महत्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. या

Gangappa Pujari

सचिन गाड: मुंबई, ता. ८ जुलै २०२४

कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ डॅडीवरील खंडणीच्या आरोपातील महत्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अरुण गवळी आणि त्याच्या साथीदारांवर खंडणी प्रकरणी लावण्यात आलेल्या मोक्का कायद्या संदर्भातील ही कागदपत्रे असल्याचे सांगण्यात येत आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष मोक्का कोर्टात ही माहिती दिली.

कारवाईची फाईल सापडेना

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आणि त्याच्या साथीदारांवर खंडणी प्रकरणी लावण्यात आलेल्या मोक्का प्रकरणातील महत्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. या खंडणी प्रकरणात उलटतपासणीसाठी अरुण गवळीच्या वकिलांना या कागपदत्रांची मागणी केली होती. ज्यानंतर गुन्हे शाखेने कोर्टात याबाबतची माहिती दिली.

न्यायालयाने पोलिसांना झापलं!

खंडणी, आर्थिक लाभ आणि 2005 मध्ये मुंबई, ठाणे आणि कल्याणधील मालमत्ता हडप करण्यासाठी काहींना धमक्या दिल्याचा आहे अरुण गवळी आणि त्याच्या साथीदारांवर आरोप आहे. गेल्या महिन्यात कागदपत्रांवरून न्यायालयाने पोलिसांना खडसावले होते.

दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खटल्यास आणखी विलंब करू शकत नाही. त्यामुळे कागदपत्रे सादर करण्यास किती वेळ लागेल ते सांगा, अशा शब्दांत न्यायालयानं पोलिसांना सुनावलं होतं. मात्र आता ही कागदपत्रेच गहाळ झाल्याचे समोर आले आहे.

काय आहे २००५ मधील प्रकरण?

मुंबईतील एका बिल्डरला 2005 मध्ये गवळीच्या टोळीकडून धमकीचे फोन आले होते. त्यात राम श्याम को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीत पुनर्विकास प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी 50 लाख रूपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यासह बिल्डरला ठार मारण्याच्या धमक्या देऊन गवळीचे घर असलेल्या दगडी चाळीत जाण्यास सांगितलं होते. नंतर गवळी आणि त्याच्या साथीदारांवर खंडणी, धमकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी गवळी आणि त्याच्या साथीदारांवर मोक्काअंतर्गत कारवाई झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT