Womans Hair Cut At Dadar Station Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: तरुणीचे केस कापले, नंतर बॅगेत भरून घेऊन गेला; दादर स्टेशनवरील धक्कादायक प्रकारानं खळबळ

Womans Hair Cut At Dadar Station: कॉलेजला जाणाऱ्या तरुणीचे दादर रेल्वे स्थानकावर केस कापल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे.

Priya More

मयूर राणे, मुंबई

मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकावर धक्कादायक प्रकार घडला. तरुणीचे केस कापून मातेफिरू फरार झाल्याची घटना घडली. १९ वर्षीय तरुणी कॉलेजला जात असताना एका माथेफिरूने तिचे केस कापले आणि हे केस तो बॅगेमध्ये भरून घेऊन गेला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरुणी रुपारेल कॉलेजमध्ये शिकते. ही तरुणी नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती. दादर रेल्वे स्थानकावर पोहचताच एक तरुण पाठिमागून आला. त्याने गर्दीचा फायदा घेत सोबत आणलेली कात्री काढून तरुणीच्या केसावर फिरवली आणि तिचे केस कापले. यानंतर त्याने तिचे केस बॅगेत भरून सोबत नेले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दादर रेल्वे स्थानकावर तरुणीचे केस कापल्याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे संशयित तरुणाचा शोध घेतला. याप्रकरणी मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे तपास करत संशयित तरुणाला ताब्यात घेतले. त्या व्यक्तीने त्या तरुणीचे केस का कापले? या मागचे खरे कारण काय? याचा लोहमार्ग पोलिस तपास करत आहेत.

या घटनेनंतर घाबरलेल्या पीडित तरुणीने मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला होता. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलं. या संशयिताला दुपारनंतर कोर्टात हजर केले जाणार आहे. अधिक तपासासाठी त्याची पोलिस कोठडी मागण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Maharashtra News Live Update: नांदणी मठाची माधुरी हत्ती नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

SCROLL FOR NEXT