Mumbai Goregaon Aarey Colony Leopard Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News : मुंबईकरांनो सावधान! गोरेगावच्या आरे कॉलनी परिसरात बिबट्याचा वावर

मध्यरात्री अचानक बिबट्या दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : मुंबईच्या गोरेगाव येथील आरे कॉलनी परिसरात बिबट्याने एका दीड वर्षीय चिमुकलीवर हल्ला करून तिला ठार केलं होतं. ही घटना ताजी असतानाच, पुन्हा एकदा आरे कॉलनीती युनिट २० मध्ये बिबट्याचा वावर दिसून आला आहे. मध्यरात्री अचानक बिबट्या (Leopard) दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. (Mumbai News Today)

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या (Mumbai) गोरेगाव येथील आरे कॉलनी परिसरात बिबट्याने दहशत माजवली होती. या बिबट्याने एका दीड वर्षाच्या मुलीवर हल्ला देखील केला होता. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला होता. या भयंकर घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.

या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा आरे कॉलनी परिसरात बिबट्याचा वावर मुक्त संचार असल्याचं दिसून आलं आहे. युनिट २० समोरील पिकनिक पॉईंट येथे बिबट्या फिरताना दिसून आला आहे. (Mumbai Goregaon Aarey Colony Leopard)

यामुळे येथील आदिवासी पाड्यांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोनच दिवसांपूर्वी वनविभागाकडून त्या अल्पवयीन मुलीवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र काल मध्य रात्री आरे कॉलनी (Aarey Colony) युनिट क्रमांक 20 इथला पिकनिक पॉईंट जवळच्या रोडवर बिबट्याचे दर्शन झाले आहे.

आरेच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी पाडा आणि मानवी वस्ती आहे. मात्र आरे कॉलनी परिसरामध्ये मध्ये आठ ते दहा बिबट्या फिरत असल्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. वनविभागाने या बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

SCROLL FOR NEXT