Mumbai News  Saam TV
मुंबई/पुणे

Video : कबड्डी खेळताना तरुणाचा मैदानातच मृत्यू; मनाला चटका लावणारी घटना

किर्तिकराज मल्लन (20) असं या तरुणाचं नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> संजय गडदे

मुंबई : मुंबईच्या मालाड परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कबड्डी खेळत असताना 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मालाड येथील महापालिकेच्या लव्ह गार्डनमध्ये कबड्डी सामने सुरू असताना ही धक्कादायक घटना घडली आहे. किर्तिकराज मल्लन (20) असं या तरुणाचं नाव आहे. आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी मित्तल कॉलेजच्या माध्यमातून मालाड पश्चिमेकडील महापालिकेच्या लव गार्डनमध्ये कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. कार्तिक दिंडोशी संतोष नगर परिसरात राहणारा आहे तो गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बीकॉम प्रथम वर्ष शिक्षण घेत होता.

कार्तिकला मित्तल विद्यालयाच्या वतीने खेळण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. मात्र गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कबड्डीची मॅच सुरू असतानाच कार्तिकराजचा मृत्यू झाला. (Mumbai News)

आकाश कॉलेज विरुद्ध मित्तल कॉलेज दरम्यान कबड्डीचा सामना सुरू असताना कार्तिक खेळत होता. कार्तिक आकाश कॉलेजच्या खेळाडूंच्या खेम्यामध्ये डेडलाईन पार करून त्यांना बाद करण्याचा प्रयत्न करत असताना समोरील खेळाडूंनी त्याला पकडलं.

त्यावेळी तो बाद देखील झाला होता, मात्र माघारी फिरत असताना अचानक बेशुद्ध होऊन खाली पडला. दोन्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला.

विद्यार्थ्यांनी ताबडतोब मालाड पोलिसांना या घटनेची सूचना दिली. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी कार्तिकला जवळील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयामध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT