Mumbai Breaking News: Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Breaking News: मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान दुर्घटना; जुहू चौपाटीवर वीज कोसळली, एकाचा मृत्यू

Vishal Gangurde

संजय गडदे

Mumbai News:

मुंबईत सर्वत्र गणेश विसर्जन सुरू आहे. याचदरम्यान मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. जुहू समुद्रकिनाऱ्यावर विसर्जनासाठी तैनात असलेल्या एका स्वयंसेवकावर वीज पडल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Latest Marathi News)

मुंबईत सर्वत्र गणेश विसर्जन सुरू असताना ढगांच्या गडगटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस देखील सुरू आहे. या मुसळधार पावसातही जुहू चौपाटी येथे गणपती विसर्जन सुरू आहे. याचदरम्यान, मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान एक दुर्घटना घटना घडली आहे.

मुंबईतील जुहू चौपाटीवर वीज कोसळल्याची घटना घडली आहे. ही वीज जुहू चौपाटीवर विसर्जनासाठी तैनात असलेल्या एका स्वयंसेवकांवर पडली. त्यानंतर या स्वयंसेवक तरुणाला महापालिकेच्या कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच या तरुणाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती कूपर रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आली. या घटनेने तरुणाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुहू चौपाटीवर अंगावर वीज पडून १६ वर्षीय हसन युसूफ शेख या मुलाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या मुलावर वीज पडल्यानंतर घटनास्थळी उपस्थित लाइफगार्डने या मुलाला रुग्णवाहिकेतून कूपर रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी या जखमी मुलाला मृत घोषित केले.

गणपती विसर्जन करून आल्यानंतर चारचाकी जळून खाक, भुसावळमधील घटना

दरम्यान, जळगावच्या भुसावळमध्येही एक दुर्घटना घडली आहे. भुसावळ येथे गणपती विसर्जन करून आलेल्या एका व्यक्तीच्या चारचाकीला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत चारचाकी जळून खाक झाली आहे. तर या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

नेमकं काय घडलं?

भुसावळच्या जुना सातारा भागातील गोपाळ भंगाळे हे आपल्या कुटुंबासह भगवान परशुरामाच्या मंदिराच्या बाजूने गणेश विसर्जन करून आले. त्यानंतर बाहेर उभ्या असलेल्या गॅसवर चालणाऱ्या चारचाकीला सेल देताच या गाडीतील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर ही चारचाकी जळून खाक झाली. या घटनेत गोपाळ भंगाळे हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT