Mumbai Local News:  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local News: धावती लोकल पकडताना 2 महिलांचा तोल गेला, पण होमगार्डच्या रुपाने देवदूतच धावून आला, नेमकं काय घडलं?

Mumbai Local train video: चर्चगेटवरील याच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या होमगार्डने दोन महिला प्रवाशांचा जीव वाचवला आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे

Mumbai Local train video:

मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेन पकडायाला लाखो प्रवाशांची धडपड पाहायला मिळते. मुंबईकरांची लाईफलाईन कमी पैसे आणि कमी वेळेत प्रवाशांना योग्य स्थानकावर पोहोचवते. यामुळे ट्रेन प्लॅटफॉर्मवर येताच प्रवाशांची लगबग सुरू होते. मात्र, गेल्या वर्षांपासून लोकल ट्रेनने प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. या लाखो प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी पोलीस आणि होमगार्ड सतर्क असतात. चर्चगेटवरील याच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या होमगार्डने दोन महिला प्रवाशांचा जीव वाचवला आहे. या महिलांसाठी दोन्ही होमगार्ड देवदूतच ठरला. (Latest Marathi News)

मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील घटना आहे. चर्चगेटवर लोकल आली.त्यानंतर ही लोकल ट्रेन बोरिवलीच्या दिशेने निघाली. लोकल ट्रेन सुरू झाल्यावर काही महिला धावल्या. ही धावती लोकल ट्रेन दोन महिलांचा तोल गेला. या महिला ट्रेन खाली आल्या असत्या, मात्र तेवढ्यात दोन होमगार्ड देवदूतासारखे धावून आले. या दोन्ही होमगार्डने या दोन्ही महिलांचे प्राण वाचवले आहेत.

नेमकं काय घडलं?

गर्दीमध्ये लोकलमधून पडून अपघात होण्याच्या दुर्घटना वाढल्या आहेत. मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्थानकात देखील शनिवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास चालत्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होत्या.

या महिला लोकल ट्रेनमध्ये चढताना दोन्ही महिला पडून जखमी झाल्या आहे. या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या दोन होमगार्ड जवानांनी या महिलांना डब्बा आणि प्लॅटफॉर्मच्या दरम्यान असलेल्या गॅपमध्ये जाण्यापासून रोखले. राहुल यादव आणि आशिष गुप्ता अशी त्या होमगार्ड जवानांची नावे आहेत.

अपघाताची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चर्चगेट होऊन बोरिवलीसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून निघालेली ही बोरिवलीच्या दिशेने जाण्यासाठी निघाली असताना या महिला लोकलमध्ये चढण्याच्या प्रयत्नात होत्या.

नेमक्या त्याचवेळी दोन्ही महिलांचा तोल गेला आणि त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन पडल्या. त्यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. होमगार्ड जवानांनी या दोन्ही महिलांना तात्काळ रुग्णवाहिकेतून दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर उपचार करून त्यांना सुखरूप घरी सोडण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धुळ्यात शरद पवार गटाला खिंडार! कामराज निकम यांचा अजित पवार गटात जाहीर प्रवेश

Night Skin Care : रात्री झोपताना लावा 'हा' घरगुती फेस मास्क, सकाळी चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

Mumbai Tourism: 31 डिसेंबरला मुंबईतच पण गर्दी नसलेल्या ठिकाणी फिरायचंय? हे Hidden spots नक्की ट्राय करा

Mumbai Bullet Train : मुंबईतील बुलेट ट्रेन स्थानकाचं काम बंद! काय आहे नेमकं कारण? वाचा

Eyebrow Growth: मेकअप न करता भुवया नीट कशा दिसतील? वापरा या सोप्या टीप्स

SCROLL FOR NEXT