Kurla Building Fire Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai : कुर्ल्यातील इमारतीला भीषण आग; अनेक नागरिक अडकले

कुर्ल्यातील एका इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. टिळकनगर परिसरातील ही घटना आहे.

साम टिव्ही ब्युरो

Kurla Building Fire : कुर्ल्यातील एका इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. टिळकनगर (Mumbai) परिसरात ही घटना घडली आहे. इमारतीत काही नागरिक अडकले असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू आहे. नेमकी ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. (Mumbai News Today)

कुर्ल्यातील नवीन टिळक नगर रेल व्ह्यू इमारतीत ही मोठी इमारत आहे. या इमारतीला दुपारच्या सुमारास आग लागली. ही आग सध्या इमारतींच्या काही मजल्यांपर्यंत पोहोचली आहे. अग्निशमन दल येईपर्यंत स्थानिक नागरिकांनी आगीत अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

इमारतीला लागलेली आग भीषण असून या इमारतीतून धुराचे लोट येत आहेत. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर इमारतीतील इतर लोकांना बाहेर काढण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे. स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

१२ मजली इमारतीच्या बाराव्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती आहे. कोणालाही दुखापत झाल्याचं अद्याप वृत्त नाही. इमारतीला आग लागल्यानंतर इमारतीमधील महिला, लहान मुले हे खिडकीत येऊन मदतीसाठी हाक देत असल्याचं दिसून येत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT