Cm Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला केलं फॉलो, कार चालकाला वांद्रे पोलिसांकडून अटक

CM Eknath Shinde News: पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला फॉलो करणाऱ्याविरोधात तात्काळ कारवाई केली.

Priya More

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ताफ्याला फॉलो करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. वांद्रे पोलिसांनी (Bandra Police) ही कारवाई केली आहे. वांद्रे-वरळी सी लिंकजवळ (Bandra-Worli Sea Link) ही घटना घडली होती. पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला फॉलो करणाऱ्याविरोधात तात्काळ कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी २७ जुलै रोजी वांद्रे-वरळी सी लिंकजवळ मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढे गेल्यावर रस्ता मोकळा असल्याचे बघून ताफ्या पाठोपाठ एका व्यक्तीने आपली कार नेली होते. या व्यक्तीला मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला फॉलो केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. वांद्रे पोलिसांनी या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

भादंवि २७९ (बेदरकार पणे वाहन चालवणे) आणि ३३६ (दुसऱ्यांचा जीव किंवा वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणे) तसंच मोटर वाहन कायद्यांतर्गत या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगू रझक असं या अटक करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या गंगू रझक या कार चालकाची चौकशी केली असता त्याने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला फॉलो करण्यामागे काहीच हेतू नव्हता. आपण कामानिमित्त जात होतो आणि कार मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामागे ठेवली असे सांगितले आहे. या कारचालकाला कोर्टात हजर केले असता त्याला जामीन देण्यात आला असल्याची माहिती वांद्रे पोलिसांनीच दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT