Mumbai Fire Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire : मुंबईत इमारतीच्या ४२व्या मजल्यावर मोठी आग; अख्खा फ्लॅट जळून खाक

मुंबईतील उंच इमारतीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

Rashmi Puranik

Mumbai Fire news : मुंबईतील उंच इमारतीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या दादर येथील ४४ मजली आरए रेसिडेन्सी इमारतीच्या ४२ व्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील दादर येथील पूर्व भागीतल आरए रेसिडेन्सी इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. आरए रेसिडेन्सी इमारतीच्या ४२ व्या मजल्यावर आग लागली आहे. या आगीत ४२ व्या मजल्यावरील संपूर्ण प्लॅट जळून खाक झाला आहे.

आगीची घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील नागरिकांना अग्मिशमन दलाला घटनेची माहिती कळविली आहे. या आगीत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

दादर (Dadar) स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आरए रेसिडेन्सी या ४४ मजली इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडली. या इमारतीच्या ४२ व्या मजल्यावर आग (Fire) लागली असून कोणीही जखमी नसल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

रात्री साडे आठ वाजता लागलेली ही आग अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. अग्निशमन दलाच्या जवळपास १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इमारतीमधील सर्व रहिवाशांना बाहेर काढले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT