actress son dies after fatal fall from 57th floor x
मुंबई/पुणे

Mumbai : प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाने स्वत:ला संपवलं, ५७ व्या मजल्यावरुन मारली उडी

Mumbai News : मुंबईच्या कांदिवली परिसरातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका टीव्ही अभिनेत्रीच्या मुलाने इमारतीच्या ५७ व्या मजल्यावरुन आत्महत्या केली आहे.

Yash Shirke

Mumbai : मुंबईतील कांदिवली परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. बुधवार (२ जुलै) रोजी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. ट्यूशन क्लासला न जाण्यावरुन रागात मुलाने इमारतीच्या ५७ व्या मजल्यावरुन खाली उडी मारली. यात मुलाचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कांदिवली परिसरात सी ब्रुक येथे ही अभिनेत्रीचे घर आहे. गुजराती मालिकांमध्ये अभिनेत्री काम करत आहे. काल २ जुलै रोजी अभिनेत्री आणि तिच्या मुलामध्ये वाद झाला. अभिनेत्रीने मुलाला ट्यूशन क्लासला जायला सांगितले. पण मुलाला क्लासला जायची इच्छा नव्हती. यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला.

आईवर रागावलेल्या मुलाने रागाच्या भरात इमारतीच्या ५७ व्या मजल्यावरुन उडी मारली. हा मुलगा थेट खाली पडला. इतक्या उंचीवरुन खाली पडल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे अभिनेत्री आणि तिच्या पतीला मोठा धक्का बसला आहे. या दाम्पत्याचा तो एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुलाने उडी मारल्यानंतर जोरदार आवाज झाला. आवाज ऐकून इमारतीतील लोक घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर लगेचच पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरु केली. या प्रकरणी पोलिसांनी मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. पण ही आत्महत्या खरंच ट्यूशनला जाण्यावरुन झालेल्या वादामुळे झाली की यामागे इतर कोणते कारण आहे याचा पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'धनुष्यबाण चिन्ह गोठवा, चोरांना देऊ नका'; एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी उद्धव ठाकरेंची मागणी

Gautami Patil: दहीहंडीतला डान्स गौतमीला भोवणार; सण-उत्सवातील अश्लील डान्सचा वाद पेटला

PM मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, पिस्तूलधारी २ जणांना अटक; पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसखोरी कशासाठी?

Manoj Jarange: जरांगे आणि सरकार आमनेसामने, चर्चेसाठी अंतरवालीत जाण्यास विखेंचा नकार

Rahul Gandhi: राहुल गांधी घराणेशाही मोडणार? 2029 साठी काँग्रेसचा मास्टर प्लॅन

SCROLL FOR NEXT