Election Commission Team Seized 2 Kg Gold Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: निवडणूक आयोगाच्या पथकाची मोठी कारवाई, तब्बल २ किलो सोनं जप्त

Election Commission Team Seized 2 Kg Gold: विधानसभा निवडणुकीदरम्यान दहिसर पश्चिम येथे स्टॅटिक सर्व्हिलन्स टीमने १.४३ कोटी रुपयांचे सोनं जप्त केलं.

Priya More

विधानसभा निवडणुकीदरम्यान मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दहिसरमधून तब्बल २ किलो सोनं पोलिसांनी जप्त केलं आहे. दहिसर पश्चिम येथे स्टॅटिक सर्व्हिलन्स टीमने १.४३ कोटी रुपयांचे सोनं जप्त केलं. या सोन्याचे वजन १.९५ किलो इतके आहे. हे सोनं कुठून आणले आणि कोणाकडून आणले याप्रकरणी दहिसर पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर पश्चिम येखील अवधूत नगर परिसरामध्ये पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. निवडणूक अधिकारी श्रीमती शीतल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित तपासणी दरम्यान यतीन धोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम क्रमांक ९ ने यशस्वीरित्या ही कारवाई करत सोनं जप्त केले.

१.९५ किलो वजनाचे हे सोनं असून त्याची अंदाजे किंमत १.४३ कोटी रुपये इतकी आहे. मौल्यवान धातू आणि बेहिशेबी रोकड यांची अनधिकृत हालचाल रोखण्याच्या उद्देशाने नियमित पाळत ठेवण्याच्या उपायांचा एक भाग म्हणून ही जप्ती करण्यात आली. ही महत्त्वपूर्ण कारवाई विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदारांवर प्रभाव टाकू शकणाऱ्या प्रदेशातील रोख रक्कम, मौल्यवान धातू आणि मद्य यांच्या बेकायदेशीर व्यवहारांना आळा घालण्यासाठी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Historic Places : नर्मदा तटावरील राजेशाही वैभव, 'या' किल्ल्याचे रूपांतर झाले लग्जरी हॉटेलमध्ये, पर्यटकांची होते गर्दी

Bollywood Property: मलाइकाने अलिशान फ्लॅट दिला रेंटवर, इकडे सारा अन् माधुरीनं घर घेतलं भाड्याने, कितीची झाली उलाढाल?

Sonam Kapoor Baby Photo : बाळाला हातात घेताच सोनम कपूर भावुक, अनिल कपूरच्या नातवाची पाहा पहिली झलक

राज्य सरकारचा दिलासा! रेडी रेकनरच्या दराबाबत घेतला मोठा निर्णय, वाचा काय होणार फायदा?

Rule Change From Today: ATM लिमिट ते ट्रेडिंग; आजपासून ४ महत्त्वाचे नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT