Developer Cheated BMC
Developer Cheated BMC saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : विकासकाने पालिकेला घातला ५ कोटींचा गंडा! सदनिकांची केली परस्पर विक्री

Chandrakant Jagtap

>> संजय गडदे, साम टीव्ही

Developer Cheated BMC : पालिकेच्या कोट्यातील सात PAP सदनिकांची विकासकाने परस्पर विक्री करून 5 कोटीहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा प्रकार अंधेरी पूर्वमध्ये घडला आहे. या प्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची रक्कम आणि गुन्हेपद्धत पाहता हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येणार आहे.

झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातून विकासकाने इमारत उभारल्यानंतर पालिकेला 10 टक्के PAP कोट्यातील सदनिका देणे बंधनकारक आहे. मात्र अंधेरी के पूर्व विभागातील विविध एस आर ए प्रकल्पातील महापालिकेला मिळालेल्या सदनिकांपैकी सात सदनिका विकासकाने नागरिकांना बोगस ताबा पत्र देऊन परस्पर विकल्या.

यात पाच कोटी पेक्षा अधिक रकमेचा घोटाळा झाला आहे. ही बाब पालिका अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच विकासकासह एकूण 10 जणांविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र फसवणुकीची रक्कम आणि गुन्हेपद्धत पाहता हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येणार आहे.

अंधेरी के पूर्व परिसरात मेसर्स जिरे ऋषी कन्स्ट्रक्शन ग्रुपकडून एस आर ए प्रकल्प राबविण्यात आले आहे. याच प्रकल्पातील पालिकेच्या कोट्यातील सात सदनिका मेसर्स जिरे ऋषी ग्रुप आणि धीरेंद्र जटाकिया, प्रतापसिंह शिंदे दीपक भाईन, रजनीकांत फुलचंद शाह, अनुराग मोदी, नितीन कोडे, सिडनी लोबो, अनिल चंदुलाल शहा, उमेश भाग यांनी परस्पर विकले. या 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पालिकेचे देखील काही अधिकारी अडकले असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीच्या के पूर्व विभागात सध्या अनेक एस आर ए प्रकल्प सुरू आहेत. काही प्रकल्प पूर्ण देखील झाले आहेत. प्रकल्प पूर्ण होताच पालिकेच्या कोट्यातील सदनिका विकासकांकडून पालिकेच्या इस्टेट विभागाला हस्तांतरित करणे अपेक्षित असते. मात्र मेसर्स जिरे ऋषी कन्स्ट्रक्शन ग्रुपने अशा सदनिका पालिकेला न देता परस्पर विकल्या.

सदनिका खरेदी करणारे सदनिकांमध्ये गेले त्यावेळी सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखले. त्यावेळी ग्राहकांनी आपल्याकडील ताबा पत्रे दाखवली. यावर प्रशासकीय अधिकारी (मालमत्ता) के पूर्व यांची स्वाक्षरी होती. मुळात के पूर्व विभाग कार्यालयात असे पदच नसल्याने ही ताबा पत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

बनावट कागदपत्र तयार करून अशाप्रकारे सदनिका विक्री म्हणजे पालिकेची फसवणूक असल्याने अधिकाऱ्यांनी याबाबत अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पालिका अधिकाऱ्यांची तक्रार आणि त्यांनी दिलेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी विकासक यांच्यासह 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. (Latest Sports News)

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता. पालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांच्या बनावट सह्यांचा वापर केल्याचे दिसून आले. पालिकेच्या अधिकाऱ्याने याबाबत विकासकाकडे विचारणा केली, मात्र समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. हे प्रकरण आता अंधेरी पोलिसांकडून इओडब्ल्यू शाखेकडे वर्ग केले जाणार आहे. या प्रकरणात विकासकांसोबत आणखी किती लोक सहभागी आहेत आणि त्यांनी कुणाकुणाला अशी घरे विकली, यात पालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्याचा सहभाग आहे का? याविषयीचा तपास पोलीस करत आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jui Gadkari Received Threat : '... नाही तर तुला जेलमध्ये टाकेन'; जुई गडकरीला तरूणीने का दिली धमकी ?

Today's Marathi News Live : शांतीगिरी महाराजांना शिवसेनेची उमेदवारी नाहीच?, अजय बोरस्ते यांची माहिती

Raveena Tandon: रविनाचा दिलकश अंदाज; साडीतील खास फोटो पाहाच!

KKR vs DC,Playing XI: KKR संघात होणार २ मोठे बदल! पृथ्वीला संधी मिळणार का? पाहा कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

PM Modi Pagadi: पंतप्रधान मोदींसाठी खास 'दिग्विजय योद्धा पगडी', पुण्यात होणार भव्य स्वागत

SCROLL FOR NEXT