sanjay raut  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : संजय राऊतांविरोधात अटक वॉरंट जारी; जाणून घ्या काय आहे प्रकरण

राऊत गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. मात्र, सदर प्रकरणात संजय राऊत यांना तत्काळ जामीन मंजूर करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मुंबईच्या शिवडी कोर्टाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात अब्रनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांना ४ जुलै रोजी कोर्टात हजर राहण्यास सांगितले, मात्र, राऊत गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. मात्र, सदर प्रकरणात संजय राऊत यांना तत्काळ जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Sanjay Raut News In Marathi )

मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मुंबई महानगर दंडाधिकारी यांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध कलम 499, 500 आयपीसी अंतर्गत गुन्ह्यासाठी वॉरंट जारी केले. यावेळी मेधा सोमय्या यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, संजय राऊत यांना सोमवारी कोर्टात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, राऊत कोर्टात हजर राहिले नाही आणि त्यांचे वकील देखील कोर्टात हजर राहिले नाही. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ रोजी ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, सोमय्याचे वकील गुप्ता आणि लक्ष्मण कनाल यांच्या माध्यमातून तक्रार अर्जात आरोप केले आहे की, राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्या पतीविरोधात अब्रुनुकसान करणारे आरोप केले. तसेच मेधा यांच्यावर मीरा-भाईंदर महानगरपालिकेअंतर्गत सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामामध्ये १०० कोटी रुपयांचा घोटाळ्यात सामील झाल्याचा आरोप केला होता. मात्र, या प्रकरणात खासदार संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने संजय राऊतांना तत्काळ जामीन मंजूर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort In Mumbai : गर्दीपासून दूर असलेला मुंबईचा ऐतिहासिक खजिना, खूप कमी लोकांना माहितेय 'हा' किल्ला

वांगणीत चाळ माफियांना दणका; 100 हून अधिक अनधिकृत घरांवर प्रशासनाने फिरवला बुलडोझर

OTT Releases: वीकेंडचा काही प्लॅन नाही? मग घरीच OTT वरच्या 'या' ७ जबरदस्त वेब सिरीजचा आनंद घ्या

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, दोन जखमी

संतापजनक! रूम रिकामी ठेवू पण मराठी लोकांना देणार नाही; मुंबईमध्ये शिंदे कुटुंबाला घर नाकारलं

SCROLL FOR NEXT