Mumbai News : महागाईच्या झळा सोसणाऱ्या सामान्य मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. मुंबई आणि मुंबई उपनगरात सीनजीच्या दरात अडीच रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत उद्यापासून सीएनजी गॅस ८७ रुपये प्रतिकिलो दराने मिळणार आहे. आज मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होतील. (Latest Marathi News)
वाढत्या महागाईमुळे अनेकांचे कंबरडे मोडले होते. तर सीएनजीचे दर दिवसेंदिवस वाढत चालले होते. त्यामुळे वाढत्या सीएनजी दरामुळे सामान्य नागरिकांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत होत्या. याचदरम्यान, पहिल्यांदा सीएनजीचे (CNG) दर कमी करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई शहर परिसरात सीएनजी गॅस ८७ रुपये प्रतिकिलोने मिळणार आहे.
सीएनजी दर कमी केल्यामुळे रिक्षाचालक आणि टॅक्सीचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच सामान्य नागरिकांना देखील सीएनजी दर कपातीमुळे दिलासा मिळणार आहे. मुंबईत (Mumbai) सीएनजी दर ८९.५० रपये होता. तर उद्यापासून सीएनजी दर ८७ रुपये दराने मिळणार आहे. सीएनजीचे नवीन दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात झाली होती दरवाढ
महानगर गॅस लिमिटेडने नोव्हेंबर महिन्यात सीएनजी गॅस दरात वाढ केली होती. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात ३.५० रुपयांनी दरवाढ केली होती. तर घरगुती वापराच्या पीएनजी दरात दीड रुपये प्रति एससीएमची करण्यात आली होती.
दरवाढीमुळे मुंबईत सीएनजीचा दर ८९.५० रुपये प्रति किलो इतका झाला होता.त्यामुळे सामान्य नागरिकांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.