Mumbai Burning Car News Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai Burning Car News: अंधेरीत बर्निंग कारचा थरार! ओला कॅबने अचानक घेतला पेट; प्रवासी-ड्रायव्हर थोडक्यात बचावले

गाडीला आग लागतात गाडी चालक आणि प्रवासी यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ गाडीतून खाली उतरले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला...

Gangappa Pujari

संजय गडदे, प्रतिनिधी...

Mumbai Accident News: मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरातील एका ओला कारने पेट घेतल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जिवितहानी झालेली नाही. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून वाहतूकीरवरही परिणाम झाला.

कारने अचानक घेतला पेट...

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईच्या (Mumbai) अंधेरी पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरातील एका ओला कारने पेट घेतल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जिवितहानी झालेली नाही. वॅग्नर कंपनीची ओला कार अंधेरी पूर्वेकडील स्थानक परिसरात अडीच वाजण्याच्या सुमारास आली असता गाडीने अचानक पेट घेतला.

गाडीला आग लागतात गाडी चालक आणि प्रवासी यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ गाडीतून खाली उतरले. यामुळे जीवित हानी टळली. प्रवासी-ड्रायव्हर थोडक्यात बचावले. सदरच्या घटनेबाबत अग्निशमन दलाला माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

मोठा अनर्थ टळला...

गाडीतील प्रवाशांनी तत्परता दाखवल्याने मोठा अनर्थ टळा. दरम्यान, आगीच्या या घटनेमुळे अंधेरी स्थानक परिसरातील एक बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT