Mumbai News Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai News: नेहमी कामगार ओरडायचे, यावेळी मात्र नजर चुकवली अन् अनर्थ झाला; पतंग उडवताना गच्चीवरून पडून मुलाचा मृत्यू

Mumbai Crime News: मिरा रोड पूर्व पूजानगर परिसरात मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. गच्चीवर पतंग पकडण्यासाठी गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा तोल जाऊन इमारतीवरून खाली पडून मृत्यू झाला आहे.

Sandeep Gawade

महेंद्र वानखेडे, मिरा भाईंदर | ता. 8 फेब्रुवारी २०२४

Mumbai News

मिरा रोड पूर्व पूजानगर परिसरात मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. गच्चीवर पतंग पकडण्यासाठी गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा तोल जाऊन इमारतीवरून खाली पडून मृत्यू झाला आहे. हमजा मुस्ताक कुरेशी असे मयत मुलाचे नाव आहे. घटनेपूर्वी काही तास आधी सीसीटीव्हीमध्ये तो सोसायटीच्या मुलांच्या सोबत सायकल चालवताना दिसत आहे.

पूजानगर येथील शरयू अपार्टमेंटमध्ये मुस्ताक कुरेशी आपल्या पालकांबरोबर राहत होता. मंगळवारी सायंकाळी तो इमारतीच्या गच्चीवर खेळायला गेला असताना तोल जाऊन खाली पडला. यावेळी त्याला उपचारासाठी मिरा रोडच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र डोक्याला जबर मार लागल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हमजा हा सी विंगमध्ये राहात होता व इमारतीचे टेरेस नेहमी बंद असायचे मात्र सोसायटीमध्ये रिपेरिंग काम सुरू असल्याने बी विंगचे टेरेस उघडे होते. दरम्यान हमजा पतंग उडवण्यासाठी नेहमी त्या विंग मधून टेरेसवर जात होता मात्र कामगारांकडून त्याला नेहमी वरयेण्या पासून अडवले जात होते. दररोज पतंग पकडून घरात जमा करून ठेवत होता. मात्र मंगळवारी नेहमी सारखा हमजा पतंग पकडण्यासाठी टेरेस वर गेला तेव्हा कामगारांनी त्याला ओरडून परत खाली पाठवले, मात्र कामगारांचे लक्ष नसल्याचे पाहून तो टेरेसवर गेला होता. पतंग पकडण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. या घटनेमुळे सोसायटीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : उंदरांनी कुरतडलेली फळे विक्रीला? व्हायरल व्हिडिओने मुंबईकरांमध्ये खळबळ

फिफा वर्ल्डकप 2026चा 'ग्रँड फिनाले', स्पेनसमोर मेस्सीच्या अर्जेंटिनाचं तगडं आव्हान

सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून संदेश, 20 जुलैला भारताचं दुसरं स्वातंत्र्य आंदोलन, मोदी सरकारचं टेंशन वाढलं

वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पंढरपूरमध्ये यंदा वारीत ‘एअर ॲम्बुलन्स’, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: पंढरपूर कॉरिडॉरसाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेणार; जबरदस्ती नाही : एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT